file photo
file photo 
विदर्भ

डॉक्‍टरांच्या निष्काळजीमुळे बाळ दगावल्याचा आरोप

सकाळ वृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) : जामनारा येथील रासोबाई दिनेश मडावी या गर्भवती महिलेची कुरखेडा येथील उपजिल्हा रुग्णालयात नैसर्गिक प्रसूती झाल्यानंतर तिच्या नवजात बाळाचा मृत्यू झाला. तिला उपजिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यात डॉक्‍टरांनी केलेली दिरंगाई व त्याची निष्काळजी यामुळे बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या नातलगांनी केला आहे. ही घटना मंगळवारी (ता. 30) घडली.
प्राप्त माहितीनुसार, रासोबाईला मंगळवारी सकाळी 8 वाजता प्रसूतीकळा येऊ लागल्या. त्यानंतर आशा वर्करने तिला गावातीलच मदन वालदे यांची खासगी गाडी भाड्याने घेऊन बेलगाव घाट येथील उपकेंद्रामध्ये नेले. मात्र, येथील मानसेवी डॉक्‍टर दोन वर्षांपासून गैरहजर आहेत. या मानसेवी डॉक्‍टरला पगार मात्र नियमित दिला जात असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. विनोद मडावी यांनी सांगितले. यानंतर उपकेंद्राच्या आरोग्यसेविकांनी ग्रामीण डॉक्‍टरांशी संपर्क साधून रुग्णवाहिका बोलावली. मात्र, या रुग्णवाहिकेचा टायर कोरचीपासून 2 किमी अंतरावर असलेल्या गुटेकसा गावाजवळ पंक्‍चर झाला. आशा वर्करने दुसऱ्या गाडीची मागणी केली. दुसरी गाडी आल्यानंतर गर्भवती महिलेला ग्रामीण रुग्णालयात सकाळी 10 वाजता दाखल केले. डॉक्‍टरांनी गर्भवती महिलेची तपासणी केल्यानंतर येथे प्रसूती होऊ शकत नाही, असे सांगितले. दुपारी 3 वाजता महिलेला गडचिरोलीला घेऊन जाण्याचे रेफर कार्ड तयार करण्यात आले. ग्रामीण रुग्णालयाची 108 रुग्णवाहिका नादुरुस्त असल्याने गरोदर मातेला गडचिरोलीला घेऊन जाण्यासाठी खासगी वाहन रात्री 9 वाजता मिळाले. त्यानंतर आशा वर्कर व नातेवाइकांनी तिला कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी तिची नैसर्गिक प्रसूती झाली. मात्र, बाळाचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्‍टरांनी दिली. ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी 3 वाजता वाहन उपलब्ध करून दिले असते तर बाळ वाचले असते. डॉक्‍टरांच्या हलगर्जीपणामुळेच बाळ दगावले, असा आरोप तिचे पती दिनेश मडावी व नातलगांनी केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Bidkin Crime News : धक्कादायक! भीशीचे व व्याजाचे पैसे न दिल्याने महिलेसह पाच मुलांचे अपहरण

Yuzvendra Chahal: ऋषभ पंतची विकेट चहलसाठी ठरली ऐतिहासिक! T20 मध्ये कोणत्याच भारतीयाला न जमलेला केला पराक्रम

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: दुसऱ्याच चेंडूवर राजस्थानला मोठा धक्का! जैस्वालला ४ धावांवरच झाला आऊट

SCROLL FOR NEXT