वरठी : बंद असलेली नीलज येथील ग्रामपंचायत.  
विदर्भ

कोरोनाच्या धास्तीत या ग्रामपंचायतला लागले कुलूप...सांगा बरे शेतकऱ्यांची कामे कशी होणार?

सकाळ वृत्तसेवा

वरठी (जि. भंडारा) : सध्या देशासह सर्वत्रच कोरोना विषाणूच्या आजाराने थैमान घातले आहे. त्यामुळे सर्व शासकीय तसेच निमशासकीय यंत्रणा ऍलर्ट झाल्या आहेत. पण, मोहाडी तालुक्‍यातील नीलज (बु) ग्रामपंचायतीचे कार्यालय दिवसभर बंद राहत असल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा कार्यालयाला "खो'

नीलज बु. येथील ग्रामपंचायत कार्यालयात लॉकडाउन झाल्यापासून कर्मचारी येत नाहीत. ग्रामसेवक दोन गावांचा कारभार सांभाळत असल्याने कधीकधी येतात ाणि लवकरच निघून जातात. यामुळे ग्रामपंचायत कार्यालय बंद अवस्थेत आहे. गावात स्थानिक पातळीवर प्रशासकीय यंत्रणा उदासीन दिसून येत आहे. गावातील सरपंचांनी याकडे लक्ष देणे आवश्‍यक आहे.

नाममात्र औषधीची फवारणी

नीलज (बु). येथील ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाच्या काळात फक्त एकदाच नाममात्र औषधी फवारणी केली होती. तसेच या गावातील नागरिक मास्कचा वापर करीत नाही. सार्वजनिक ठिकाणी घोळक्‍याने दिसतात. परंतु, ग्रामपंचायतमार्फत जनजागृतीही केली जात नाही. त्यामुळे येथील नागरिकांत कोरोनाविषयक जनजागृती करायची गरज आहे.

काळजी आम्ही घेत आहोत
ग्रामपंचायतीमार्फत कोरोनाबाबत जनजागृती सुरू आहे. मागील दिवसातच जंतुनाशक फवारणी करण्यात आली आहे. नागरिकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी माहिती दिली आहे. नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी आम्ही घेत आहोत.
- सुवर्णा गाढवे, सरपंच नीलज (बु.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pimpri News: रस्त्याचे काम... तासभर जागेवरच थांब! पिंपरी ‘एमआयडीसी’ परिसरात वाहतूक कोंडी; प्रशासनाच्या नियोजनावर संताप..

Solapur Sugarcane payment: साेलापूर जिल्ह्यात ११०० कोटींची ऊसबिले थकली; शेतकऱ्यांना आतापर्यंत मिळाले तीन हजार ४७६ कोटी, तीव्र संताप व्यक्त!

Gautam Gambhir: स्वत:साठी नव्हे, करंडकासाठीच खेळा! विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक गंभीर यांचा भारतीय संघासाठी मंत्र

Latest Marathi News Live Update : इराण–इस्रायल तणावाचा परिणाम? कोल्हापुरात गॅस सिलेंडरसाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा

Pune Health Crisis: पुण्यात तरुणाईवर अदृश्य संकट! ७५ हजारांना बीपी, ४४ हजारांना मधुमेह; जीवनशैलीचे आजार वेगाने पसरतायत

SCROLL FOR NEXT