विदर्भ

एनआयटीचे अस्तित्व कायम राहणार

नीलेश डोये
नागपूर : सरकारने नागपूर सुधार प्रन्यास (एनआयटी) बरखास्त करण्याची घोषणा केली असली तरी प्रत्यक्षात अध्यादेशात काही सुधारणा करण्यात आल्याने प्रन्यासचे अस्तित्व कायम राहणार आहे. भविष्यात सुधार प्रन्यास बरखास्त झाल्यास त्याच्या मालमत्तेची व अधिकाराची विभागणीबाबतची तरतूद या कलमांमध्ये करण्यात आली असल्याने सध्यातरी प्रन्यासला जीवदान मिळाल्याचे दिसून येते.
नागपूर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचा निर्णय मंत्रिमंडळात घेण्यात आल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली होती हे विशेष. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याऐवजी कायद्यात दुरुस्ती केल्याने आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. आचारसंहिता पाच दिवसांत लगणार असल्याने फडणवीस सरकारच्या या कार्यकाळात तरी सुधार प्रन्यास बरखास्त होणार नसल्याचे दिसते.
शहरात एकच विकास संस्था पाहिजे त्यामुळे सुधार प्रन्यास बरखास्त करण्यासाठी विरोधात असताना भाजप नेत्यांकडून आंदोलन करण्यात आले. सत्तेत आल्यावर सुधार प्रन्यास बरखास्त करण्याचे आश्‍वासन भाजप नेत्यांकडून मागील विधानसभा निवडणुकीच्या काळात देण्यात आले होते. मेट्रो रिजनऐवजी एनएमआरडीए करण्यात आल्याने सुधार प्रन्यास बरखास्त करण्यात येणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. सरकारने काही दिवसांपूर्वी सुधार प्रन्यासच्या अधिकारातील सात योजना या नागपूर महानगरपालिकेला हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला. त्यापूर्वी मंत्रिमंडळात बरखास्तीचा निर्णय घेण्यात आला. मात्र सरकारने बरखास्त करण्याऐवजी कायद्यात दुरुस्ती करणारा अध्यादेश 9 सप्टेंबरला काढला आहे. ही तरतूद सुधार प्रन्यास बरखास्तीच्या दिशेने वाटचाल असल्याचे पाऊल बोलले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT