Nitin Gadkari
Nitin Gadkari 
विदर्भ

LokSabha 2019 : आता आणखी दणदणीत विजय मिळविणार : नितीन गडकरी 

वृत्तसंस्था

नागपूर : 'पक्षाने पुन्हा एकदा माझ्यावर विश्‍वास दाखवला आहे. आता मी गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्‍य घेऊन जिंकेन', असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज (गुरुवार) व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने पहिली यादी आज सायंकाळी जाहीर केली. या यादीची घोषणा करताना गडकरी यांचे तिसरे नाव घेण्यात आले, हादेखील एक सूचक बदल मानला जात आहे. 

भाजपचे ज्येष्ठ नेते जे. पी. नड्डा यांनी पत्रकार परिषदेमध्ये एकूण 184 उमेदवारांची यादी जाहीर केली. त्यामध्ये सर्वांत पहिले नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे होते. त्यानंतर गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या मतदारसंघाची घोषणा करण्यात आली. त्यानंतर गडकरींचा मतदारसंघ जाहीर करण्यात आला. 

गडकरी यंदा पुन्हा नागपूरमधून निवडणूक लढविणार आहेत. त्यासंदर्भात गडकरी म्हणाले, 'पक्षाने माझ्यावर विश्‍वास दाखवला आहे. नागपूरच्या जनतेने गेल्या निवडणुकीमध्ये मला साथ दिली होती. आमच्या कामावर जनता समाधानी आहे. पुन्हा निवडून आल्यावर आम्ही यापेक्षा चांगली कामगिरी करू. आता मी गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मताधिक्‍याने जिंकणार आहे.'' नितीन गडकरी यांच्याविरोधात नागपूरमधून काँग्रेसने नाना पटोले यांना उमेदवारी दिली आहे. 

2014 मधील लोकसभा निवडणुकीमध्ये गडकरी यांना 5,87,767 इतकी मते मिळाली होती. त्यांच्याविरोधातील काँग्रेसच्या विलास मुत्तेमवार यांना 3,02,939 इतकी मते मिळाली होती. गडकरींनी या निवडणुकीमध्ये 2,84,828 इतक्‍या मताधिक्‍याने विजय मिळविल्या होत्या. 

अडवानींचा पत्ता मोदी-शहांनी केला कट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT