gad 
विदर्भ

ब्रिटिशकालीन विश्रामगृहांचा ऐतिहासिक वारसा हळूहळू होतोय नष्ट!

तिरुपती चिट्याला

सिरोंचा (जि. गडचिरोली) : ब्रिटिशांचे भारतावर राज्य असताना त्या काळातील अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांनी निसर्गरम्य ठिकाणी सुंदर विश्रामगृहे बांधली होती. पण, देखभाल व दुरुस्तीअभावी आता अशी असंख्य विश्रामगृहे दयनीय अवस्थेत आहेत. सिरोंचा तालुक्‍यातील ब्रिटिशकालीन विश्रामगृहे भग्नावस्थेत आहेत.

महाराष्ट्र राज्याचा शेवटचा जिल्हा असलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील दक्षिण टोकावर असलेला सिरोंचा तालुका ब्रिटिशांच्या आवडीचा परिसर होता. येथे मिळणाऱ्या उच्च प्रतिच्या सागवानमुळे ब्रिटिश या परिसराकडे आकर्षित झाले. येथील सिरोंचा हे शहर प्राणहिता व गोदावरी या दोन नद्यांच्या किनाऱ्यावर वसलेले असून सर्वत्र हिरवाई व नद्यांचा समृद्ध प्रवाह असल्याने अनेक ब्रिटिश येथे रमले. त्यामुळे त्याकाळात येथे राहिलेल्या अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या आठवणी येथील नागरिक सांगतात.

इंग्रजांच्या काळात तेलंगणा, महाराष्ट्र राज्यातील सिरोंचा परिसर आणि छत्तीसगड या प्रदेशात ब्रिटिश अधिकाऱ्यांचा सातत्याने वावर होता. अनेक ब्रिटिश अधिकारी थेट लंडनहून येथे यायचे. सिरोंचा जंगलव्याप्त असल्यामुळे त्यांना येथील शांत वातावरण व हिरवाई ब्रिटिशांना खूप आवडली. शिवाय मौल्यवान सागवान येथेच होते. त्यामुळे ब्रिटिशांचा येथे राबता होता. त्यांनीच या परिसराचे महत्त्व ओळखून या परिसराला जिल्ह्याचा दर्जा दिला. राहण्यासाठी त्यांनी येथे अनेक सुबक विश्रामगृहे उभारली.

सिरोंचा तालुक्‍यात सोमनूर, कोप्पेला तसेच लगतच्या छत्तीसगड राज्यातील भोपलपट्टणम येथे ही विश्रामगृहे आजही आहेत. ब्रिटिशांच्या काळात दळणवळणाची फारशी व्यवस्था नसल्याने ते घोड्याच्या साहाय्याने राज्यात फिरत होते. सिरोंचा येथून सोमनपल्ली -कोप्पेला - भोपलपट्टणम, असा त्यांचा प्रवासाचा मार्ग असायचा. त्यामुळे प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी ही विश्रामगृहे बांधण्यात आली. विशेष म्हणजे सिरोंचा, सोमनपल्ली व भोपलपट्टणम येथील तीनही विश्रामगृहे नद्यांच्या किनाऱ्यावरच आहेत. यामधील कोपेला येथील विश्रामगृह काही समाजकंटकांनी पेटवून दिले. सोमनपल्ली येथील विश्रामगृहाची पडझड झाली असून सिरोंचा व भोपालपट्टणम येथील विश्रामगृहांनी शंभरी पूर्ण केली आहे.

सविस्तर वाचा - गडचिरोली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी वडेट्टीवारांनाच पसंती!
पर्यटनस्थळ म्हणून विकास करावा
सिरोंचा तालुक्‍यासह गडचिरोली जिल्ह्यात विविध ठिकाणी असलेल्या ब्रिटिशकालीन विश्रामगृहांची डागडुजी करून त्यांचा वापर पर्यटकांना राहण्यासाठी करता येतो. शिवाय ही विश्रामगृहे असलेला परिसर पर्यटनस्थळ म्हणून विकसित करता येऊ शकतो.त्यातून जिल्ह्यातील अनेकांना रोजगार मिळेल. या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FOREIGN JOB OPPORTUNITIES: या राशींच्या लोकांना मिळू शकते परदेशात जाण्याची संधी; करिअर आणि पैशांसाठी ठरू शकतो मोठा टर्निंग पॉइंट

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Water Scarcity : अंबड तालुक्यात पाणी टंचाईचे सावट: लघु,पाझर तलाव कोरडेठाक तर विहिरी, कूपनलिका ची पाणी पातळी चालली खालावत

CSK Head Coach: जहीर खानकडे चेन्नई सुपर किंग्सची धुरा! IPL 2027 साठी माजी भारतीय स्टारची हेड कोचपदी नियुक्ती, CSKचा मोठा निर्णय

Marathi News Live Updates: राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय, ५ दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT