Maharashtra Weather Update 
विदर्भ

Weather Update: ना ढग, ना वारा, फक्त घामाच्या धारा! उष्णतेच्या आजारांमध्येही दिवसेंदिवस होतेय वाढ

Gadchiroli weather: मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू असून सूर्य मागील काही दिवसांपासून सतत आग ओकत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.

मिलिंद उमरे : सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : मे महिन्याचा उत्तरार्ध सुरू असून सूर्य मागील काही दिवसांपासून सतत आग ओकत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे उष्णतेचे आजार वाढले असून सारेच आता पावसाची चातकासारखी वाट बघू लागले आहेत.

तापमानाचा पारा सतत चढत असून उन्हाचे चटके बसत आहेत. यंदा एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे तापमान बरेच घसरले होते. त्यामुळे हा उन्हाळा की पावसाळा असा संभ्रम निर्माण झाला होता. वृक्ष आणि पशूपक्षीही या विचित्र बदलाने संभ्रमित होऊन पावसाळ्यातील ऋतूप्रमाणे वर्तन करू लागले होते.

संपूर्ण एप्रिल महिन्यात ढगाळी वातावरण व अवकाळी पावसाने उन्हाळा जरा लांबवला. त्यातच मे महिन्याच्या पहिल्या तारखेपासूनच अवकाळी पावसाचे ढग कोसळल्यामुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले.

मात्र साधारणत: 3 मेपासून अवकाळीचे ढग ओसरल्याने जिल्ह्यातील नागरिकांना दिलासा मिळाला. परंतु तापमानाचा पारा वेगाने वर चढू लागल्याने नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे. आता उष्णता जास्तच वाढली आहे.

साधारणत: मार्च महिन्यापासून उन्हाळ्याची चाहूल लागते. तापमान चढत जाते. मात्र मार्च महिन्यापासूनच विदर्भासह जिल्ह्यावर अवकाळी पावसाचे ढग आले. त्यामुळे जिल्ह्यात ऊन- सावलीचा खेळ सुरू झाला होता.

कधी अवकाळी पावसाचे ढग तर कधी सूर्याची आग ओकणे सुरू राहिले. एप्रिल महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. गारपिटीसह पाऊस आला. यामुळे जिल्ह्याचे तापमान चांगलेच घसरले होते.

अवकाळी पावसामुळे वातावरणात निर्माण झालेल्या गारव्याने 40 अंशावर पोहोचलेला पार 35 ते 36 अंशावर उतरला होता. मात्र मे महिन्यापासून तापनात वाढ होऊन पारा 42 अंशापर्यंत गेल्याने कडक उन्हाळ्याच्या झळा बसत आहेत.

पहाटे सहा वाजताही सर्वत्र स्वच्छ प्रकाश दिसतो. आता सकाळऐवजी दुपार होते, असे नागरिक म्हणत आहेत. भर दुपारी सूर्य असा काही तापतो की रस्तेही ओस पडू लागतात.

पूर्वी कितीही उन्हाळा असला, तरी घरातील एका टेबल फॅन किंवा सिलिंग फॅनमुळेही गारवा मिळायचा. पण आता प्रत्येक घरात कुलर्सच घरघरत आहेत.

आर्थिकदृष्ट्या संपन्न लोकांकडे वातानुकुलीत यंत्र ( एसी) सतत सुरू आहेत. या उन्हाळ्याच्या काळात घराबाहेर पडावे की नाही, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे.

संध्याकाळी 6. 30 ते 7 वाजेपर्यंत अंधार पडतच नाही. स्वच्छ संधीप्रकाश सर्वत्र असतो. पूर्वी सूर्य मावळला की उन्हाची काही कमी व्हायची. हवेत गारवा निर्माण व्हायचा.

डोलणाऱ्या वृक्षांतून वाऱ्याची सुखद झुळूक यायची. पण आता पुर्वीसारखे वृक्ष, गर्द झाडीही राहिली नाही. आकाशही पूर्ण निरभ्र असून त्यातून फक्त तीव्र उन्ह येत आहे.

त्यामुळे ना ढग, ना वारा, फक्त फक्त घामाच्या धारा, अशी अवस्था झाली आहे. या तीव्र उन्हामुळे उष्माघात, उन्हाळी लागणे, ताप असे उष्णतेचे आजार वाढले आहेत.

घ्या आरोग्याची काळजी...

सध्याची उन्हाची तिव्रता प्रचंड असून तापमानाचा पारा चाळीशी पार आहे. म्हणून या काळात नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याची गरज आहे. उन्ह बाधू नये यासाठी सतत पाणी पिणे गरजेचे आहे.

बाहेर पडताना डोक्यावर टोपी, स्कार्फ, डोळ्यांच्या सुरक्षेसाठी डार्क गाॅगल वापरणे गरजेचे आहे. आहार साधा घ्यावा. तसेच फळांचा वापर जास्त करावा. ऊसाचा रस घ्यावा, द्राक्ष, टरबूज़, खरबूज, डाळींब अशा फळांचा वापर करावा, असे आरोग्य तज्ज्ञांनी सांगितले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT