File photo
File photo 
विदर्भ

नऊ शेतकऱ्यांना बजावली नोटीस

सकाळवृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : पिकांवर कीटकनाशक फवारताना विषबाधा होऊ नये, म्हणून घ्यावयाच्या दक्षतेचे उल्लंघन केल्याबद्दल तहसीलदार डॉ. संजय गरकल यांनी तालुक्‍यातील नऊ शेतकऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
तहसीलदार डॉ. गरकल व तालुका कृषी अधिकारी प्रकाश राठोड यांनी प्रत्यक्ष शेतशिवारात पाहणी केली असता, नऊ शेतकरी संरक्षककीटचा वापर न करता फवारणी करताना आढळून आले. फवारणी करताना घ्यावयाच्या दक्षतेचे उल्लंघन केल्याने कारवाई का करण्यात येऊ नये, अशी विचारणा या सूचनापत्रातून तहसीलदारांनी केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गेल्यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकाची फवारणी करताना विषबाधा होऊन 22 शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. यावर्षी प्रशासनाने खबरदारी घेत शेतकऱ्यांनी संरक्षककिटसह फवारणी करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. फवारणीसंदर्भात कोणती काळजी घ्यावी, यासाठी कार्यशाळा घेण्यात आल्या. प्रत्यक्ष शेतावर प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. तरीही शेतकरी ही बाब गांभीर्याने घेत नसल्याचे अधिकाऱ्यांना शेतशिवारात आढळून आले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची नोटीस बजावण्यात आली. नोटीस बजावण्यात आलेल्या शेतकऱ्यांमध्ये विजय बोरकर (बोरी), परमेश्‍वर जैस्वाल (कोपरा बुद्रूक), मोहन राठोड (शेलू), संजय चव्हाण (सावरगाव), विजय जाधव (पुसद), तर फुलवाडी येथील दीपक बेले, मनोज आडे, तुळशीराम धुळे, अरविंद चव्हाण या नऊ शेतकऱ्यांचा समावेश आहे.

फवारणी करताना विषबाधा होऊ नये, यासाठी सुरक्षित साधनांचा वापर शेतकरी-शेतमजुरांनी करावा, या उद्देशाने नोटीस बजावल्या आहेत.
- डॉ. संजय गरकल, तहसीलदार, पुसद.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Ground Report: राम सातपुतेंना धक्का बसणार की प्रणिती शिंदेंना? वंचित गेम चेंजर ठरणार...ग्राऊंड रिपोर्ट वाचा...

जे कुटुंबाला सांभाळू शकत नाहीत ते महाराष्ट्राला काय सांभाळणार?; PM मोदींची पवारांवर कडवट टीका

Gurucharan Singh : गुरुचरण सिंहने रचलाय बेपत्ता असल्याचा कट ? ; पोलिसांनी व्यक्त केला संशय

Suryakumar Yadav: भारताचा 'मिस्टर 360' सूर्यानं 'बेबी एबी'ला शिकवला कसा खेळायचा सुपला शॉट, पाहा Video

Latest Marathi News Live Update : "चित्रा वाघ यांनी माझी माफी मागावी," अनभिनेते राज नयानी यांचा इशारा

SCROLL FOR NEXT