भंडारा : ऑक्सि‍मीटरने पल्स तपासून घेताना जिल्हाधिकारी संदीप कदम. 
विदर्भ

नवे जिल्हाधिकारी म्हणाले, नागरिकांनी करावे सहकार्य...भंडारा शहरात प्रत्येकाची होणार रॅपिड अँटिजेन तपासणी

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : भंडारा शहरात लवकरच अँटिजेन तपासणीची सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. शहरातील मोक्‍याच्या ठिकाणी तीन तपासणी केंद्र कार्यान्वित करून नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे. व्यापारी तसेच नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी स्वयंस्फूर्तीने तपासणीसाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे.

नागपूर विभागीय आयुक्त संजीव कुमार यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विभागाचा आढावा घेतला. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कॉन्फरन्समध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्वरी एस., जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. माधुरी माथूरकर, डॉ. प्रशांत उईके उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यापार संघटनेला दुकानात प्रत्यक्ष तपासणी तसेच अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांनीसुद्धा अँटिजेन तपासणी करून घेण्याच्या सूचना दिल्या. गावात सरपंचांच्या मार्गदर्शनाखाली घरोघरी टेस्ट करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. शहरात मुस्लिम लॉयब्ररी चौक, गांधी शाळा, राजीव गांधी चौकात गणेश विद्यालय तसेच दसरा मैदान येथे तपासणी केंद्र कार्यान्वित करण्याचे प्रस्तावित करण्यात आले. नगर परिषद मुख्याधिकारी यांना विचारणा करून पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले.

प्रत्येक दुकानात तपासणी

शहरातील प्रत्येक दुकानात जाऊन ही तपासणी करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी संदीप कदम व मुख्याधिकारी भुवनेश्वरी एस. यांनी प्रत्यक्ष पल्स ऑक्सिमीटरद्वारे तपासणी करून सिक्‍स मिनिट वॉक टेस्टमध्ये सहभाग घेतला. कोरोनाला न घाबरता प्रत्येक नागरिकांनी तपासणी करणे आवश्‍यक असल्याचा संदेश जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना दिला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, तसेच डॉक्‍टर्स उपस्थित होते.


व्यापारी संघटनेशी बैठक

शहरातील व्यापारी संघटनेशी जिल्हाधिकारी यांनी बैठक घेतली. यावेळी नगर प्रशासन अधिकारी पाटील, नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते. यावेळी नियोजित अँटिजेन टेस्टसाठी व्यापारी संघटनेनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले. त्याला व्यापारी संघटनेने सकारात्मक आश्‍वासन दिले.

नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवावे
कोरोना हा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी सुरक्षित अंतर ठेवून वावरावे. वारंवार साबणाने हात धुवून स्वच्छ करावे. आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य महत्त्वाचे आहे. जवळच्या कुठल्याही व्यक्तीला लक्षणे आढळून आल्यास तत्काळ तपासणी करा. कोरोनामुक्त भंडारा ठेवण्यासाठी नागरिकांनी जास्तीत जास्त तपासणी करून घ्यावी.
- संदीप कदम
जिल्हाधिकारी, भंडारा.


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video : विनायक चतुर्थीनिमित्त अन्नदान कार्यक्रमात दुर्दैवी अपघात; गरम सांबारच्या भांड्यात पडून महिलेचा मृत्यू,थरकाप उडवणारा व्हिडिओ

Maharashtra Rain Alert : राज्यात परतीच्या पावसाचा जोर वाढणार; विदर्भ-मराठवाड्यासह २९ जिल्ह्यांना येलो अलर्ट

Chana Moong Dal Chilla: हेल्दी नाश्ता म्हणजे बेचव नाही! असा बनवा चणे-मूग चिला! खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल

आजचे राशिभविष्य - 23 सप्टेंबर 2026

Azamgarh Hostage Crisis : आझमगढ हादरलं! आधी पत्नी अन् दोन पुजाऱ्यांची हत्या, मग मुलावर झाडली गोळी; ८ तासांच्या ऑपरेशननंतर आरोपीचा एन्काउंटर

SCROLL FOR NEXT