crime  
विदर्भ

काय सांगता? यवतमाळमध्येही आता गॅंगवार! वाचा नेमके काय

सुरज पाटील

यवतमाळ : महिनाभरापूर्वी जिल्हा कारागृहातून बाहेर आलेल्या तरुणाचा पूर्ववैमनस्यातून धारदार शास्त्राने गळा चिरून खून करण्यात आला. ही घटना बुधवारी (ता.२६) दुपारी दोनच्या दरम्यान लोहारा परिसरात दारव्हा रोडवर घडली. या रक्तरंजित घटनेतील चारही मारेकऱ्यांना अवघ्या काही तासांत बेड्या ठोकण्यात आल्या.

देवीदास निरंजन चव्हाण (वय २५, रा. उद्योगनगर, यवतमाळ) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित मारेकरी सिद्धार्थ उर्फ सिद्धू वानखडे (रा. उद्योगनगर), दीपक उर्फ भय्या यादव (रा. देवीनगर), सिद्धेश्वर रावेकर (वय २५), अजय वासनिक (वय २०) यांना ताब्यात घेतले.

२०१८ मधील सप्टेंबर महिन्यात देवीदास याने भय्या यादव याच्यावर प्राणघातक हल्ला केला होता. त्यावेळी पोलिस अधिकाऱ्याने हल्ला परतवून लावण्यासाठी गोळीबारदेखील केला होता. या घटनेपासून देवीदास हा कारागृहात होता. जवळपास महिनाभरापूर्वी तो कारागृहातून बाहेर आला होता. तर, त्याचा भाऊ दुर्गेश एका खून प्रकरणात अजूनही कारागृहात आहे.चव्हाण बंधू गुन्हेगारी वृत्तीचे असल्याने बोलले जाते.

विरोधी टोळीचे सदस्य देवीदासच्या मागावर होते. काल दुपारी देवीदास दुचाकीने जात असताना मारेकऱ्यांनी कारने पाठलाग करून त्याला खाली पाडले व धारदार शस्त्राने गळा, पोट, हातावर वार केले. अतिरिक्त रक्तस्त्राव झाल्याने देवीदासचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भरदुपारी घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती. या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी शरद चंद्रशेखर बोंद्रे (वय ३१, रा. उद्योगनगर) याने लोहारा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून सिद्धार्थ उर्फ सिद्धू वानखडे, दीपक उर्फ भय्या यादव, सिद्धेश्वर रावेकर, अजय वासनिक यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. या प्रकरणाला टोळी युद्धाची किनार असल्याने पोलिसांनी अवघ्या काही तासांत मारेकऱ्यांना जेरबंद केले. पुढील तपास ठाणेदार सचिन लुले करीत आहेत. लोहाऱ्यात मागील काही वर्षांत नवनवीन टोळ्यांचा जन्म होत आहे. आपापले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी प्रतिस्पर्धी टोळीतील सदस्याचा गेम करण्यात येत आहे.

'त्या' घटनेचा बदला?
दोन वर्षांपूर्वी म्हणजे सप्टेंबर २०१८ला गणपती विसर्जनाच्या दिवशी देवीदास चव्हाण याने भय्या यादव याच्यावर हल्ला चढविला होता. त्याचवेळी पेट्रोलिंगवर असलेले टोळी विरोधी पथकाचे तत्कालीन प्रमुख पीएसआय संतोष मनवर घटनास्थळी दाखल झाले होते. त्यावेळी देवीदासने त्यांच्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला होता. हा हल्ला परतवून लावण्यासाठी पीएसआय मनवर यांनी गोळीबार केला होता. भय्या यादव याने त्या घटनेचा बदला घेतल्याचे सांगितले जाते.

क्लिक करा - आयुक्त मुंढेच्या बदलीसाठी कोणी केला समझोता?, वाचा सविस्तर

कारने चिरडण्याचा प्रयत्न
देवीदास व शरद दोघेही दुचाकीने घराकडे जात असताना कारने धडक दिली. मारेकऱ्यांनी धारदार शस्त्राने देवीदासचा खून केला. तर प्रत्यक्षदर्शी तथा फिर्यादी शरद याच्या अंगावर कार नेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. यात तोदेखील जखमी झाला आहे.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG, 2nd T20I: वैभव सूर्यवंशीचं अखेर पदार्पण झालं, पण कोणाला मिळाला संघातून डच्चू? पाहा भारत-इंग्लंडची Playing XI

Women Farmers Lead: भिवधानोरा गावातील शेतकरी महिलांची जलसंधारण, सेंद्रिय शेती व सामूहिक खरेदीत आदर्श कामगिरी; पाणी फाउंडेशन स्पर्धेत उठून दिसले योगदान

Latest Marathi Live Update : मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळली; वाहतूक विस्कळीत

School Flooding: पहिल्याच पावसात अगरकानडगाव जि.प. शाळा जलमय; विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात, कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी शिरसाट यांची पाहणी

Mumbai Rain: पावसाने उघड केलं विकासाचं वास्तव! मुंबईत झाडं कोसळली, रस्ते वाहून गेले, मिसिंग लिंकवर खड्ड्यांचं साम्राज्य

SCROLL FOR NEXT