file photo 
विदर्भ

आता तुम्हीच सांगा, नियम विद्यापीठाचा मान्य करायचा की राज्यशासनाचा 

भूषण काळे

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राचार्य यांच्या सेवानिवृत्तीच्या वयात वाढ केलेल्या निर्णयाच्या विरोधात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कार्यकारी परिषदेचे सदस्य नितीन हिवसे यांनी राज्यपालांकडे तक्रार केली आहे. या दिशानिर्देशामुळे प्राध्यापक व प्राचार्य यांच्या सेवानिवृत्तीसंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यापीठाचे नियम मान्य करायचा, की राज्यशासनाचा असा पेच महाविद्यालयीन प्रशासन व संस्थाचालक यांच्यापुढे निर्माण झाला आहे. 

सेवानिवृत्तीबाबत संभ्रम कायम 


संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने 13 डिसेंबर 2019 रोजी काढलेल्या ऑर्डिनन्सनुसार अभियांत्रिकीचे प्राध्यापक व प्राचार्य यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 व 62 वरून अनुक्रमे 65 व 70 केले आहे. राज्य शासनाच्या नियमानुसार अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्राचार्य यांच्या सेवानिवृत्तीचे वय अनुक्रमे 60 व 62 वर्ष आहे. या संदर्भात राज्यातील इतर विद्यापीठ तथा शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची माहिती घेतली असता सेवानिवृत्तीचे वय हे राज्य शासनाच्या नियमानुसार असल्याचे पुढे आले आहे. 

राज्य शासनाच्या आदेशाकडे दुर्लक्ष 

राज्यातील सर्वच महाविद्यालयातील प्राध्यापक व प्राचार्य यांची नियुक्ती व सेवानिवृत्तीचे नियम हे समान असणे क्रमप्राप्त आहे. मात्र संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाने याला केराची टोपली दाखवत 13 डिसेंबर 2019 रोजी काढलेल्या ऑर्डिनन्सनुसार सेवानिवृत्तीचे वय हे 60 व 61 वरून अनुक्रमे 65 व 70 केले आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रशासनाने हे दिशानिर्देश काढून शासनाने घालून दिलेली संवैधानिक चौकट मोडून काढल्याचा आरोप नितीन हिवसे यांनी केला आहे. या सर्व बाबी नमूद असताना अमरावती विद्यापीठाने काढलेल्या ऑर्डिनन्समुळे संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्याची मागणी हिवसे यांनी केली आहे. 

राज्य शासनाला अधिकार 

केंद्र शासन आणि त्यांच्या स्वायत्त संस्था जसे विद्यापीठ अनुदान आयोग व अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद यांचे काम मार्गदर्शक तत्त्वे किंवा नियमावली बनविणे आहे. त्या नियमात बदल करण्याचा अधिकार राज्यशासन व विधिमंडळ यांना संविधानाने दिला आहे. याचाच वापर करून राज्यशासनाने युजीसीच्या नियमावलीला अनुसरून विद्यापीठ कायदा 2016 अस्तित्वात आणला. ज्यात बदल करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे, असे नितीन हिवसे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Laxman Hake: आता बस झालं..आम्ही हरलो आहोत! ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचा मोठा निर्णय

रश्मिका मंदानाने पहिल्यांदाच दाखवलं तिचं मंगळसूत्र; इतकं साधं अन् सुंदर की जान्हवीचं मंगळसूत्रही विसराल!

Stray Dog Attack : आईसोबत चाललेल्या मुलावर मोकाट कुत्र्यांचा हल्ला; प्रसंगावधान राखून आईने स्वतःच्या अंगावर हल्ला झेलत मुलाचे प्राण वाचवले, झटापटीत आई गंभीर जखमी

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

CM Devendra Fadnavis : मराठवाड्यातील पुढच्या पिढीला दुष्काळ पाहू देणार नाही

SCROLL FOR NEXT