विदर्भ

ओबीसींचा एकसंघ हुंकार

सकाळवृत्तसेवा

नागपूर - ओबीसी बांधवांच्या महामोर्चाने गुरुवारी विधानभवनावर धडक देत अधिकारांसाठी हुंकार भरला. केंद्र आणि राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाच्या स्थापनेसह 21 कलमी मागण्या मोर्चेकऱ्यांनी शासनदरबारी मांडल्या. सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांनी एकाच व्यासपीठावरून हक्क मिळवून घेण्यासाठी लढा अधिक तीव्र करण्याचा निर्धार केला.

राष्ट्रीय ओबीसी महासंघातर्फे या मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सकाळपासूनच पिवळ्या टोप्या, पिवळी टी- शर्ट आणि गळ्यात पिवळा दुपट्टा घातलेल्या ओबीसी बांधवांनी काचीपुरा चौकात गर्दी केली होती.

काचीपुरा चौकातून हा मोर्चा विधानभवनाच्या दिशेने निघाला. मॉरिस कॉलेज टी पॉइंटवर अडविण्यात आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, पशू, दुग्ध व मत्स्य विकासमंत्री महादेव जानकर यांनी मोर्चाला भेट दिली. ओबीसींचे प्रतिनिधी म्हणून आपण आलो आहोत, सर्व प्रश्‍नांची जाण आहे. मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लावून मागण्यांवर तोडगा काढण्याची ग्वाही मंत्रिद्वयींनी दिली.

खासदार पटोलेंना भोवळ
भाषणानंतर खाली उतरलेले खासदार पटोले काही वेळ उभे राहिल्यानंतर अचानक खाली बसले. त्यांना अस्वस्थ वाटत असल्याने तातडीने डॉक्‍टरांना पाचारण करण्यात आले. मोर्चापासून काही अंतरावर त्यांना नेऊन बसविण्यात आले. काही वेळात ते पुन्हा मोर्चात सहभागी झाले.

प्रमुख मागण्या

  • केंद्र व राज्यात स्वतंत्र ओबीसी मंत्रालय असावे
  • ओबीसींची जनगणना जाहीर करा
  • मंडल, नच्चीपन व स्वामिनाथन आयोग लागू करा
  • शेतकरी, शेतमजुरांना 60 वर्षांनंतर पेन्शन मिळावी
  • केंद्राची मॅट्रिकोत्तर शंभर टक्के शिष्यवृत्ती ओबीसी विद्यार्थ्यांना द्या
  • ओबीसींसाठी स्वतंत्र मतदारसंघ जाहीर करा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Avinash Jadhav: अविनाश जाधव यांच्याविरोधात गुन्हा दाखल, 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, काय आहे प्रकरण?

Delhi Bomb Threats: दिल्ली बॉम्बच्या धमक्यांचे दक्षिण कोरिया, फ्रान्स कनेक्शन; मेल डोमेन अन् वीपीएनबाबत धक्कादायक माहिती समोर

लग्नामुळे महिलेचे स्वातंत्र्य संपत नाही; तिला स्वतःच्या आवडीनुसार जगण्याचा पूर्ण अधिकार; उच्च न्यायालयाचा निर्वाळा

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी रायबरेलीतून, तर किशोरीलाल शर्मा अमेठीतून निवडणूक लढवणार; काँग्रेसची यादी जाहीर

SCROLL FOR NEXT