Chittaranjan-Manik
Chittaranjan-Manik 
विदर्भ

जुन्या नोटा बदलवून देणारे आजोबा!

राघवेंद्र टोकेकर

नागपूर - प्रत्येकाला निरनिराळ्या प्रकारचे छंद असतात. कोणाचा चमच्यांचा तर कोणी आगपेट्या संग्रहीत करतात. कोणाला घड्याळांची तर कोणाला जुन्या नोटा आणि पुरातन नाणी जमविण्याचा छंद असतो. महत्त्वाचे म्हणजे काहींचा संग्रह लाखांच्या घरांत असून, संग्रह करणे म्हणजे खजिना जमावल्यासारखे त्यांना वाटते. मात्र शहरातील एक आजोबा छंदीष्ट लोकांचा संग्रह पैस्याविना वाढावा यासाठी प्रयत्न करतात. नेमके काय आहे त्यांचे काम जाणून घेऊ या... 

चित्तरंजन माणीक हे ७९ वर्षांचे आजोबा. सातत्याने शहराच्या विविध भागात भ्रमंतीवर असतात. जुन्या नाण्यांचा संग्रह करणाऱ्या छंदीष्ट लोकांना आवश्‍यकतेनुसार नाणी मिळवून देण्याच्या ते प्रयत्ना असतात. या कामात ते १९७१ पासून असून, त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेकांच्या संग्रहात वाढ झाली असल्याची माहिती माणीक आजोबांनी दिली. यासंदर्भात माणीक म्हणाले, छंदीष्ट लोकांना संग्रह करण्यासाठी प्रचंड खर्च येतो. मात्र नाण्यांची अदलाबदल झाल्यास पैसा वाचतो. म्हणून संग्रहकाला आवश्‍यक असलेल्या नाण्याच्या बदलीत आम्ही त्याला हवे असणारे नाणे देतो.  

यासंदर्भात आम्ही नाण्यांच्या किंमती जाणून घेण्यासाठी प्रसिद्ध संग्रहक चेतन अग्निहोत्री यांच्याशी संपर्क केला तर नाही नाण्यांची व जुन्या नोटांची किंमत लाखांच्या घरांत असल्याची माहिती मिळाली. गव्हर्मेंट ऑफ हिंदूस्थानच्या ५ हजार रुपयांच्या रजिस्टरच्या आकारातील नोट आज सुमारे १५ लाखांच्या घरात मिळते. ब्रिटीश सरकारच्या काळात चलनात असलेल्या अडीच रुपयांची नोट एक लाखांच्या वर मिळते आहे. १९५० साली भारत सरकारने चलनात आणलेली २० रुपयांची नोट आज ५ हजारांना मिळते. १ हजार रुपयांची नोट १५ हजार रुपयांना मिळत असल्याची माहिती त्यांनी दिली. भोसलेकालीन नाणी दोनशे ते चारशे रुपयांच्या घरांत असून, नागवंशातली नाणी सुमारे शंभर ते तीनशे रुपयांच्या घरात मिळतात. तसेच इस्ट इंडिया कंपनीने १८३५ साली चलनात आणलेल्या एक रुपयांचा नाणा ३ हजार रुपयांना मिळतो. इतकेच नव्हे तर शिवाई नाण्यांची किंमत सुमारे पंधराशेंच्या वर असून, काही नाणी तर लाखांच्या घरांत असल्याचे माहिती त्यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : स्वाती मालीवाल प्रकरणी विभव कुमार यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज

Hair Care Tips : केसांसाठी फायदेशीर आहे हेअर स्पा, घरीच कसा करायचा ते जाणून घ्या!

Aye Haye Oye Hoye Viral Song: जे गाणं ऐकल्यानंतर नेटकऱ्यांनी कानावर ठेवले हात, त्याचं ओरिजनल व्हर्जन आहे भन्नाट

Indian Team Coach : द्रविड, लक्ष्मणनंतर ऑस्ट्रेलियाच्या या दिग्गजाचाही नकार; हेड कोच निवडताना बीसीसीआयची वाढणार डोकेदुखी?

Narayana Murthy: आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे नोकऱ्यांवर काय परिणाम होणार? नारायण मूर्तींनी दिले उत्तर

SCROLL FOR NEXT