Tiger sakal
विदर्भ

Tiger Attack : वाघाच्या हल्ल्यात वृद्ध महिला ठार

वाघाने केलेल्या हल्ल्यात तेंदुपत्ता तोडत असलेली एक ६४ वर्षीय वृद्ध महिला ठार झाली.

सकाळ वृत्तसेवा

धानोरा (जि. गडचिरोली) - शहरापासून अवघ्या १० किमी अंतरावर असलेल्या आंबेशिवणी जवळील बामणी बीट क्रमांक ४११ मध्ये वाघाने केलेल्या हल्ल्यात तेंदुपत्ता तोडत असलेली एक ६४ वर्षीय वृद्ध महिला ठार झाली. ही घटना मंगळवार (ता. १४) सकाळी ७:३० वाजताच्या दरम्यान घडली असून मृत महिलेचे नाव पार्वता बालाजी पाल (वय ६४) रा. आंबेशिवणी, असे आहे.

जिल्हाभरात सध्या तेंदूपत्ता संकलनाचे काम सुरू असून जवळपास एक आठवडा चालणाऱ्या या तेंदूपत्ता संकलनासाठी हजारो मजूर, शेतकरी जिवाची पर्वा न करता जंगल परिसरामध्ये तेंदुपत्ता संकलन करत असतात. या तेदुपत्ता संकलनावर त्यांचा वर्षभराचा बजेट अवलंबून असतो. मृत पार्वता पाल गावातील काही नागरिकांसह तेंदूपत्ता संकलन करत असताना जंगलात दबा धरून बसलेल्या वाघाने तिच्यावर हल्ला करून जागीच ठार केले.

गावातील नागरिकांनी घटनेची माहिती पोलिस पाटील भैसारे यांनी गडचिरोली वनविभागाला दिली. चातगावचे वनपरीक्षेत्र अधिकारी पडवे यांनी आपल्या चमुसह आंबेशिवणी येथील बामणी बीट क्रमांक ४११ मध्ये दाखल होत पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.

गडचिरोली पोलिस स्टेशनचे ठाणेदार अरुण फेडगे यांच्या मार्गदर्शनात अधिक तपास सुरू आहे . पार्वता पाल यांच्या पश्चात पती, मुलगा , सुन, नातवंडे व बराच मोठा आप्त परीवार आहे. हल्लेखोर वाघाला जेरबंद करून मृताच्या कुटूंबाला तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold-Silver Rate Today: सोनं-चांदीच्या भावात मोठी घसरण! 11 सप्टेंबरला पुन्हा दर कोसळणार? जाणून घ्या ताजी अपडेट

‘त्याला माझी इनसिक्युरिटी वाटायची’; अनेक वर्षांनंतर नीना गुप्तांनी उघड केलं गुपित, म्हणाल्या...'माझ्यापेक्षा जास्त...'

ChatGPT's 80s Photo Trend: Instagram वर व्हायरल होतोय 'ChatGPT ’80s Photo Trend'; 'हा' सोपा प्रॉम्प्ट वापरून तयार करा तुमचा ८० च्या दशकातील रेट्रो लूक!

Marathi News Live Updates : लातूर जिल्ह्यात कोरडा दुष्काळ; शेतकऱ्यांच्या स्वप्नांची माती, मायबाप सरकारला आर्त हाक

Share Market Today: इराणच्या अमेरिकेला धमकीने शेअर बाजार कोसळला! सेन्सेक्स 500 अंकांनी खाली; कोणत्या शेअर्सला मोठा फटका?

SCROLL FOR NEXT