one died and two injured in road accident in korchi of gadchiroli 
विदर्भ

दुर्दैवी भावाला बघता आलं नाही बहिणीचं लग्न, पत्रिका वाटायला गेला अन् सर्वच संपलं

सकाळ वृत्तसेवा

कोरची (जि. गडचिरोली) : बहिणीचे लग्न जुळले. त्यामुळे घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. साखरपुडा उरकला आणि अवघ्या काही दिवसांवर म्हणजे १४ एप्रिलच्या मुहूर्तावर बहिणीचं लग्न होते. बहिणीचे लग्न असल्यामुळे भाऊ अत्यंत खुश होऊन लग्नाच्या तयारीला लागला. चुलत भावांना घेऊन पत्रिका वाटायला गेला अन् होत्याचं नव्हतं झालं. बहिणीला बोहल्यावर चढताना पाहण्याचे स्वप्न अधुरेच राहिले. 

कोरची येथून २ किमी अंतरावर असलेल्या कोचीनारा येथील एक युवक आपल्या बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटून परत येत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला, तर सोबत असलेले इतर दोघे गंभीर जखमी झाले. मृत युवकाचे नाव पवन केजाराम देवांगन (वय २५) असून गंभीर जखमींमध्ये प्रमोद करंगसू देवांगन (वय २४) व जागेश्‍वर पंचराम देवांगन (वय १९, रा. कोचीनारा) यांचा समावेश आहे. बेळगाव-झनकारगोंदी फाट्यावर मोटारसायकलचा तोल जाऊन हा अपघात घडला. 

अत्यंत गरीब कुटुंबातील पवन देवांगन याच्या बहिणीचे लग्न १४ एप्रिल रोजी आहे. बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटप करून तो चुलत भावांना घेऊन परत येत होता. यावेळी बेळगाव-झनकारगोंदी फाट्यावर त्याच्या मोटारसायकलचे संतुलन बिघडून अपघात घडला. यात पवन देवांगनाचा जागीच मृत्यू झाला, तर इतर गंभीर जखमींवर ग्रामीण रुग्णालय कोरची येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचार करण्यासाठी गडचिरोली येथे हलविण्याची कार्यवाही सुरू होती. 


 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pink E-Rickshaw Scheme: पिंक ई-रिक्षाचा वेग नागपुरात ‘स्लो’; १४०० पैकी केवळ सोळाच रस्त्यावर, महिलांना स्वावलंबी बनविणारी योजना

Latest Marathi News Updates : - पंढरपुरात जोरदार पाऊस सुरू

Hingoli News: अडीच तासांची थरारक प्रतीक्षा; पुरात अडकलेल्या युवकाला ग्रामस्थांनी जीव धोक्यात घालून वाचवले

झुपेडियानं लुटलं! फोटोला रिव्ह्यू देताच पैसे मिळणार, स्कीमने गंडवलं; तरुणांसह शिक्षक अन् कर्मचाऱ्यांची कोट्यवधींची फसवणूक

Crime News: प्रेमविवाहाचा भीषण शेवट! पतीने पत्नीला रस्त्यावर गोळ्या घालून संपवलं, मृतदेहाजवळ पिस्तूल घेऊन उभा राहीला

SCROLL FOR NEXT