NGP 
विदर्भ

अनाथ चिमुकल्याला कवेत घेताना पाणावले उपविभागीय अधिकाऱ्यांचे डोळे!

राहुल मैद

ब्रह्मपुरी (चंद्रपूर) : पती-पत्नी दोघे दुचाकीने शहरात आले. कामे आटोपली. आणि घरी असलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्याच्या ओढीने दोघेही गावाकडे निघाले. मात्र, धावत्या वाहनावर वीज कोसळली आणि पती-पत्नीचा मृत्यू झाला. या घटनेनंतर एक वर्षाचा चिमुकला पोरका झाला. तर, दुसरीकडे वृद्ध मातेचा आधार हिरावला गेला. उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांनी आपद्‌ग्रस्त कुटुंबीयांची भेट घेतली. आस्थेने विचारपूस केली अन्‌ एक वर्षांच्या चिमुकल्याला कवेत घेत मायेने कुरवाळले. यावेळी डोंबे यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली. प्रशासकीय सेवेत मोठ्या हुद्यावर असलेली सुद्धा माणसेच आहेत. त्यांनासुद्धा भावना असतात, हे उपस्थितांनी उघड्या डोळ्यांनी बघितले.

तालुक्‍यातील पारडगाव येथील पिंटू राऊत व गुंजविणा राऊत हे दोघे पती-पत्नी १८ सप्टेंबरला कामानिमित्त दुचाकीने शहरात गेले होते. शहरातील कामे आटोपून गावाकडे निघाले. ब्रह्मपुरी-आरमोरी राष्ट्रीय महामार्गावरील उदापूर गावाजवळ त्यांच्या धावत्या दुचाकीवर वीज कोसळली. या घटनेत दोघांचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे एक वर्षाचा पार्षद कायमचा पोरका झाला. तर, पिंटूची वृद्ध आई कुसुम राऊत यांचा आधार हिरावल्या गेला.

या घटनेची माहिती ब्रह्मपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे यांना घटनेच्या दिवशीच मिळाली. त्यानंतर त्यांनी सदर कुटुंबीयांची संपूर्ण माहिती गोळा करून चिमुकल्याच्या भविष्याचे काय, वृद्ध आजी त्याचे संगोपन करण्यास समर्थ आहे काय, असे अनेक प्रश्न त्यांच्या डोक्‍यात घर करू लागले.

सविस्तर वाचा -  दोन्ही मुलींना होती बाबांची प्रतीक्षा, पण घडले धक्कादायकच!

त्यानंतर त्यांनी राऊत कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. आस्थेने विचारपूस केली. एक वर्षाच्या चिमुकल्या पार्षदला कवेत घेत मायेने कुरवाळले. यावेळी त्यांना अश्रू रोखता आले नाही. हा घटनाक्रम बघून उपस्थितांचेही डोळे पाणावले. यावेळी वृद्ध आईला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले. तसेच शासकीय मदतीसाठी कार्यालयात चकरा माराव्या लागू नये म्हणून शासकीय मदत मिळवून देण्याची संपूर्ण जबाबदारी घेतली. एवढेच नाही, तर भविष्यातही शासकीय कामासाठी त्रास होणार नाही, याची जबाबदारी स्वीकारणार असल्याचे सांगितले. यावेळी क्रांती डोंबे यांच्यासह उपवनसंरक्षक रामेश्वरी बोंगाळे, ग्रामविकास अधिकारी पालेवार उपस्थित होते.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Rain : राज्यात पावसाचा कहर ! मुसळधार पावसाने मुंबई ठप्प, पुण्यात जनजीवन विस्कळीत; मध्य महाराष्ट्र-विदर्भात अलर्ट जारी

Pune Crime: 'Sorry Mummy' मेसेजनंतर खळबळ! 'ज्युस घेऊन येते' म्हणत घराबाहेर पडलेली अल्पवयीन बेपत्ता; चुलत भावावर गुन्हा

Konkan Nuclear project: कोकणात अणुऊर्जा प्रकल्पाचे संकेत! राज्य सरकारचे विधानसभेत स्पष्टीकरण; नेमका प्रकल्प कुठे उभारणार?

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Latest Marathi News Live Update : श्रीवर्धन मधील बोर्ली पंचतन परिसरात एसटीला अपघात

SCROLL FOR NEXT