File photo 
विदर्भ

यवतमाळ जिल्ह्यातील केवळ तीन प्रकल्प भरले

सकाळ वृत्तसेवा

यवतमाळ : जिल्ह्याची पावसाची वार्षिक सरासरी 911.34 मिलिमीटर आहे. पावसाळ्याचा उत्तरार्ध सुरू झालेला आहे. आतापर्यंत वार्षिक सरासरीच्या 56 टक्के पर्जन्यमान झालेले असून, जिल्ह्यात आतापर्यंत केवळ तीन प्रकल्प भरलेले आहेत. उर्वरित सर्व प्रकल्प अपूर्ण असल्यामुळे भविष्यात सिंचन व पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडण्याची शक्‍यता आहे.
जिल्ह्यात चार मोठे, सहा मध्यम व अनेक लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांतील जलसाठ्यावरून जिल्हाभरात सिंचन व पाणीपुरवठ्याचे नियोजन केले जाते. मात्र, यंदा केवळ 56 टक्केच पर्जन्यमान झाल्याने प्रकल्प अपूर्ण आहेत. बेंबळा, सायखेडा, नवरगाव हे केवळ तीन प्रकल्प भरलेले आहेत. उर्वरीत प्रकल्प अपूर्ण आहेत. त्यामध्ये पूस प्रकल्पात 45 टक्के जलसाठा आहे. अरुणावती 13 टक्के, गोकी 53, वाघाडी 80, बोरगाव 97, अधरपूस 98, अडाण प्रकल्पात 14 टक्के जलसाठा आहे.
यवतमाळ जिल्ह्यात खरीप हंगामानंतर रब्बीला सुरुवात होते. जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्‍टरवर रब्बी हंगामाची पेरणी होते. त्यासाठी जमिनीत ओलावा असणे गरजेचे आहे. मात्र, यंदा पर्जन्यमान कमी झाल्याने जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओलावा निर्माण झाला नाही. त्यातच प्रकल्प अपूर्ण असल्याने व सिंचनासाठी अडचण येणार आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain: महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा कहर! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन; दिला सतर्कतेचा इशारा

Nagpur Vidhan Bhavan Project: नागपूर विधानभवनाचे रूपडे पालटणार; १,००० कोटींचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प, दोन्ही सभागृह येणार एकाच छताखाली

Latest Marathi Live Update : लोणावळ्या कडे जाणाऱ्या रोडवर दरड कोसळली, कातळ धबधबा शेजारची घटना

Maharashtra Rain: पालघरमध्ये मुसळधार! 24 तासांत 134 मिमी पाऊस, जनजीवन विस्कळीत; वाहतूक ठप्प

Navi Mumbai: बटाटावड्यात आढळली अळी, नवी मुंबई महापालिकेच्या भोजनालयातील प्रकार

SCROLL FOR NEXT