machine.jpg
machine.jpg 
विदर्भ

जंतुनाशक फवारणी पाॅईंटची युक्ती लयभारी, अनेकांना होतोय लाभ

सकाळ वृत्तसेवा

संग्रामपूर (जि.बुलडाणा) : तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या टुनकी या गावांमध्ये डॉक्टर संतोष प्रकाश लाल जयस्वाल यांनी स्वखर्चाने टुनकी बसस्थानकांवर जंतुनाशक फवारणी पॉईंट सुरू केले. 

भारतामध्ये सध्या कोरोना विषाणूने थैमान घातलेला आहे. त्याच्यावरती आजपर्यंत तरी कोणतेही औषध निघाले नाही. त्यामुळे भारताने सध्या लाॅकडाउन चालू आहे. शासनाने सांगीतलेल्या ऊपायामध्ये जंतुनाशक फवारणी हाही एक ऊपाय आहे. खबरदारी हा पर्याय म्हणून डॉ. संतोष जयस्वाल यांनी मागील पंधरा दिवसांपासून स्वखर्चाने टुनकी गावांमध्ये जंतुनाशक फवारणी करीत आहेत. 

हे यंत्र बनवण्यासाठी त्यांनी एक 4 बाय 7 लोखंडी अँगलचा ढाचा तयार करुन त्यामध्ये स्प्रिंकलर लावले व बाजुला एका पलंगा वरती पाण्याची टाकी ठेवली. हे यंत्र बनवण्यासाठी रितेश काटकर यांनी त्यांना सहभाग दिला व त्यामध्ये जंतुनाशक औषधी टाकुन टुनकी बस स्थानकावरती येणाऱ्या जाणाऱ्या सर्व नागरिकांनी यांचा फायदा घ्यावा असे आव्हान त्यानी केले. याचा लाभ बस स्थानकावरती कार्यरत असलेल्या पोलिस बांधवांनी सुद्धा घेतला. सध्या कोरोना ही महामारी बिमारी असल्यामुळे शासन व प्रशासन दिवसरात्र एक करून कोरोनाच्या विरोधात लढा देत आहेत. 

अशातच सामाजिक लोकांची पण मदत मिळत आहे. याचेच उदाहरण म्हणून टूनकी येथील डाॅ. संतोष जयस्वाल आहेत. ते स्वतः डाॅ. असल्यामुळे त्यांना या बिमारीचे वास्तव्य समजून आहे. म्हणून त्यांनी आपल्या गावात कोरोनाचा शिरकाव झाला नाही पाहिजे म्हणून लाॅकडाऊन पासून दररोज त्यांच्याकडून जंतुनाशक फवारणी होत होती व आज त्यांनी फवारणी यंत्र तयार करून हे यंत्र बस स्टँडवर उभे करून येणाऱ्या जणाऱ्या व्यक्ती, डाॅक्टर, पोलिस व इतर नागरिक यांचा लाभ घेत आहे. या यामुळे डाॅ संतोष जयस्वाल यांचे कौतुक होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : लोकसभा मतदानाचा तिसरा टप्पा; कित्येक दिग्गजांचं भवितव्य आज ईव्हीएममध्ये होणार कैद

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 7 मे 2024

Loksabha Election 2024 : मतदानाचा आज तिसरा टप्पा; राज्यातील ११ मतदारसंघांमध्ये तयारी पूर्ण

Dr. Amol Kolhe : आढळराव पाटील शब्द पाळणार का?

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

SCROLL FOR NEXT