Loksabha Election 2024 esakal
विदर्भ

Plaghar Loksabha Election : अखेर, भाजपने पालघरची जागा शिवसेनेकडून खेचली

पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बंडाला आले यश.

भगवान खैरनार

मोखाडा - लोकसभेच्या पालघरच्या जागेवरून महायुतीत भाजप आणि शिवसेनेत मोठी रस्सीखेच सुरू होती. शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी राजेंद्र गावीत यांची ऊमेदवारी एक महिना अगोदरच जाहीर केली होती. त्यादृष्टीने गावीत यांनी प्रचारही सुरू केला. मात्र, या निर्णयाला भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी ऊघड विरोध केला होता.

तसेच जिल्ह्यातील भाजपचे वरिष्ठ पदाधिकार्यांनी तसेच तालुकाध्यक्षांनी ही जागा भाजपला मिळावी तसेच निष्ठावान कार्यकर्त्यांला ऊमेदवारी द्यावी असा बंडाचा पवित्रा घेतला होता. अखेर, भाजपच्या वरिष्ठांना त्याची दखल घ्यावी लागली आणि शिवसेनेवर पालघरची जागा सोडवण्याची नामुष्की ओढवली व ही जागा भाजपला मिळाली. भाजपला जागा मिळाल्याने, भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बंडाला यश आल्याची जिल्ह्यात चर्चा रंगली आहे.

भाजप आणि सेनेच्या 25 वर्षाच्या युतीत पुर्वीचा डहाणू आणि आताची पालघर लोकसभेची जागा भाजप कडे राहीली आहे. याला अपवाद ठरली ती 2019 ची निवडणुक. त्यावेळी भाजपने, ऊमेदवार राजेंद्र गावीत यांच्या सह ही जागा शिवसेनेला बहाल केली होती. यावेळी ती पुन्हा आपल्याकडेच रहावी म्हणून शिवसेना नेते आणि पदाधिकार्यांनी मोठा हट्ट धरला होता. तसेच राजेंद गावीतांची ऊमेदवारी देखील महिनाभरापुरर्वीच श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केली होती. त्यादृष्टीने गावीतांनी प्रचारालाही सुरूवात केली होती. 

दरम्यानच्या काळात भाजप पालघर जिल्हाध्यक्ष भरत रजपूत यांनी राजेंद्र गावीतांच्या ऊमेदवारीला ऊघड विरोध करत माध्यमांकडे प्रतिक्रिया नोंदवली होती. त्यानंतर जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्यांनी आणि तालुकाध्यक्षांनी बैठक घेऊन ही जागा भाजपलाच मिळावी आणि निष्ठावान कार्यकर्त्यांला ऊमेदवारी देण्याची मागणी केली.

तसेच राजेंद गावीतांच्या ऊमेदवारीला कडाडून विरोध केला होता आणि राजीनामास्र देण्याचा ईशारा दिला होता. त्यानंतर महायुतीत वरिष्ठ पातळीवर मोठ्या घडामोडी आणि तडजोडी झाल्या. त्यानंतर पालघरची जागा भाजपला मिळाल्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना जाहीर करावे लागले आहे. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील भाजप पदाधिकार्यांनी आणि तालुकाध्यक्षांनी केलेल्या बंडाला यश आल्याचे स्पष्ट झाले आहे. 

जिल्ह्यात सहा विधानसभा क्षेत्र आहेत. यामध्ये भाजपचा एकही प्रतिनिधी नाही. आता लोकसभेची जागा मिळवली खरी, परंतु येथील ऊमेदवार निवडुन आणण्याचे मोठे आव्हान भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांपुढे आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी जिल्ह्यात पक्षाची बांधणी केली आहे.

आता महायुतीच्या पदाधिकार्यांना एक दिलाने काम करून पालघर मध्ये विजय संपादन करावा लागणार आहे. त्यासाठी महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे मनोमिलन करण्याची जबाबदारी वरिष्ठांना घ्यावी लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, SA vs WI: दक्षिण आफ्रिकेचे सेमीफायनलच्या दिशेने पाऊल; वेस्ट इंडिजला हरवून भारतासाठीही उघडलीत दारं

Sunetra Pawar: सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष; प्रफुल्ल पटेल यांची घोषणा

T20 WC, IND vs ZIM: भारतीय संघ २ बदलांसह उतरणार; झिम्बाब्वेविरुद्धच्या Playing XI मध्ये स्टार खेळाडू परतले, कोणाचा पत्ता झाला कट ?

Indian Railways Digital Initiative : भारतीय रेल्वेने उचललं मोठं डिजिटल पाऊल!, ‘रेल टेक पोर्टल’ अन् ‘ई-आरसीटी’ प्रणाली सुरू

Latest Marathi News Live Update : तीन तास बसूनही आमचा एफआयआर घेतला नाही - रोहित पवार

SCROLL FOR NEXT