file photo
file photo 
विदर्भ

धक्कादायक! कबड्डी खेळता खेळता जमिनीवर पडला अन् रुग्णालयात झाला खेळाडूचा मृत्यू

संतोष ताकपिरे

अमरावती : चिखलदरा तालुक्‍यातील मोरगढ येथे कबड्डी खेळताना जखमी झालेल्या युवकाचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. ३०) जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झाला. सूरज रामप्रसाद धिकार (वय २०, रा. बस्तापूर) असे मृत युवकाचे नाव आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

चिखलदरा तालुक्यातील बस्तापूरपासून पंधरा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरगढ या आदिवासीबहुल भागात बुधवार(ता. २८)पासून एका स्थानिक मंडळाच्या वतीने कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले. तालुक्‍यातील आसपासच्या गावातील बरेच संघ मोरगढमध्ये खेळण्यासाठी आले होते. सायंकाळपासून सुरू होणारे सामने रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होते.

जाणून घ्या : संत्राच्या थेट विक्रीतून शेतकऱ्यांना नफा; व्यापाऱ्यांच्या भावाला बळी पडू नये

सामनादरम्यान जमिनीवर पडला

एका सामन्यात सूरज हा प्रतिस्पर्धी संघाच्या विरुद्ध चढाई करीत असताना खेळाडूंनी त्याला पकडले. जमिनीवर पडल्यामुळे सूरजला भोवळ आली. त्यात मेंदूला अंतर्गत दुखापत झाली. प्रकृती खालावल्यामुळे आयोजकांनी त्याला आसपासच्या गावात फिरविले. घटनेची माहिती तातडीने त्याच्या नातेवाइकांना देणे किंवा त्यापूर्वीच रुग्णालयात दाखल करण्याची कारवाई आयोजकांनी केली नाही.


मेंदूला गंभीर दुखापतीमुळे झाला मृत्यू

मध्यरात्रीनंतर या घटनेबाबत जखमी सूरजच्या नातेवाइकांना माहिती दिली, असे निकटवर्तीयांनी सांगितले. नातेवाइकांनी जखमीस उपचाराकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु मेंदूला झालेली अंतर्गत दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने सूरज धिकार याचा उपचारादरम्यान शुक्रवारी (ता. ३०) सकाळी इर्विनमध्ये मृत्यू झाला. या घटनेबाबत गावात शोककळा पसरली आहे. एका चांगल्या खेळाडूंचा कबड्डी खेळादरम्यान जखमी होऊन मृत्यू झाल्याने गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली आहे.
 


(संपादन : दुलिराम रहांगडाले)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

Shreyas Talpade: कोरोना लसीमुळे हृदयविकाराचा झटका आला? श्रेयस तळपदे म्हणाला,'लस घेतल्यानंतर मला...'

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : चाहरनं सीएसकेला पाडलं खिंडार, ऋतुराज पाठोपाठ दुबेलाही केलं बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

SCROLL FOR NEXT