PM Modi MP Visit gondia discussion between pm narendra modi and praful patel at Birsi airport Sakal
विदर्भ

PM Modi MP Visit : बिरसी विमानतळावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात चर्चा

पंतप्रधान मोदी प्रचार सभेनंतर परत येऊन विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रविवारी महाराष्ट्राच्या सीमेलगतच्या शिवणीमध्ये (मध्यप्रदेश) प्रचार दौरा असून, तेथे जाण्यासाठी गोंदिया येथील बिरसी विमानतळावर सकाळी १० वाजता पंतप्रधान मोदी यांचे आगमन झाले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) गटाचे कार्यकारी अध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, गोंदियाचे आमदार विनोद अग्रवाल, माजी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी पुष्पगुच्छ देवून पंतप्रधान मोदींचे स्वागत केले.

पंतप्रधान मोदी यांच्या या दौऱ्याविषयी मोठी गोपनीयता बाळगण्यात आली होती. पंतप्रधान मोदी प्रचार सभेनंतर परत येऊन विशेष विमानाने दिल्लीकडे प्रयाण करतील. पंतप्रधानांच्या या दौऱ्यानिमित्ताने बिरसी विमानतळ परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.

या करिता गोंदिया जिल्ह्यासह शेजारील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली आदी जिल्ह्यांतून पोलिस बळ, श्वान पथक, बॉम्ब शोध पथक, अशी विविध पथकांसह अतिरिक्त कुमक मागवण्यात आली. मागील चार दिवसांपासून हा परिसर ताब्यात घेण्यात आला होता. तीन दिवसांपासून पोलिसांच्या विविध पथकांची मॉकड्रिल सुरू होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीचे वेळापत्रक ठरलं! राज्यात १५,६३१ पोलिसांची भरती; वयोमर्यादा संपलेल्या ‘या’ उमेदवारांना एक संधी; अर्जासाठी ४५० ते ३५० रुपये शुल्क

Donald Trump: ट्रम्प यांच्या शपथविधीपूर्वीचे अपशकुन अन् दुर्याेधनाच्या जन्माची वेळ; भारतावरचं सर्वात मोठं संकट?

Rain-Maharashtra Latest Live News Update: गडचिरोलीत पुरामुळे अडकलेले विद्यार्थी प्रशासनाच्या तत्परतेने परीक्षेसाठी दिल्ली रवाना

CM Devendra Fadnavis : डेटा, एआय व क्वांटम कॉम्प्युटिंगमुळे उत्तम मनुष्यबळ निर्माण होणार

Selu News : पुरात वाहून गेलेल्या एकाचा मृतदेह सापडला; दुसऱ्याचा शोध सुरू

SCROLL FOR NEXT