Sanjay Sable 
विदर्भ

कोरोनाबाधित भागात तैनात पोलिसाची आत्महत्या, विदर्भातील या जिल्ह्यात उडाली खळबळ

सकाळवृत्तसेवा

यवतमाळ : देशात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून राज्यांतही याचे प्रमाण सर्वाधिक आहे. यातच यवतमाळ पोलिस मुख्यालयात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचार्‍याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवार (ता.12) रात्री आठच्या सुमारास पोलिस मुख्यालयातील शासकीय निवासस्थानी उघडकीस आली. त्यामुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

उमरखेड तालुक्यातील जेवली येथील संजय रतीराम साबळे हे काही दिवसांपासून पोलिस मुख्यालयात कर्तव्यावर होते. त्यांची ड्यूटी शहरातील कोरोनाबाधित भागातील इंदिरानगर या ठिकाणी होती. मगंळवारी ते पळसवाडी येथे असलेल्या आपल्या शासकीय निवासस्थानी परतले. घरात आल्यानंतर त्यांनी गळफास लावून घेतला.

शासकीय निवासस्थानात घेतला गळफास
गेल्या काही दिवसांपासून संजयची पत्नी माहेरीच आहे. बाळंतपणासाठी पत्नी माहेरी गेल्याने ते घरी एकटेच राहत होते. संजय यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस कर्मचार्‍यांच्या आत्महत्येने जिल्हा पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येमागील कारण समोर आले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bay Of Bengal Low Presssure : हंगामी कमी दाबाचा पट्टा सक्रिय; पाऊस पुन्हा जोर धरणार, महाराष्ट्रात २२ जिल्ह्यात वादळी पावसाचा अंदाज

Sindhudurg Crime: सावंतवाडीतील बाप-लेकाचा म्हापसा येथे गूढ मृत्यू; पत्नी अत्यवस्थ; कारण अस्पष्ट, घातपाताची शंका, रात्री काय घडलं..

Ketan Agarwal Murder : ११.५ तासांच्या चौकशीत सियाच्या आई-वडिलांनी काय सांगितलं? एकाच खुलाशाने हत्या प्रकरणाला नवं वळण, सियाला तोंडघशी पाडले

Women's T20 World Cup: भारत-ऑस्ट्रेलिया आज आमनेसामने; पराभवानंतरही टीम इंडिया सेमीफायनल गाठू शकते? समजून घ्या संपूर्ण गणित!

Satara Crime: मायणीत १७ लाखांच्या बेकायदेशीर जिलेटिन साठ्यावर पोलिसांचा छापा; दोघा भावांना अटक, सातारा जिल्ह्यात खळबळ!

SCROLL FOR NEXT