विदर्भ

पोलिसांच्या मदतीने केली घरफोडी 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - घराचा वाद न्यायालयात प्रलंबित असताना पोलिसांच्या मदतीने घरमालकाने आपल्या घराचे कुलूप तोडले. दागिने, शैक्षणिक साहित्य चोरल्याचा आरोप डॉ. शिवशंकर दास व डॉ. क्षीप्रा उके आणि भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे यांनी काल पत्रकार परिषदेत केला. नुकसानभरपाई न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा भीम आर्मीने यावेळी दिला. 

दास यांनी सांगितले की, लक्ष्मीनगर येथे घर भाड्याचे घेतले होते. 11 महिन्यांचा करारही करण्यात आला होता. करारात वाढ करण्यास घर मालक यांनी नकार दिला. मात्र, दुसरे घर मिळेपर्यंत राहण्यास सहमती दिली. यासाठी मूळ भाडे करारात 10 टक्के वाढही करण्यात आली. दरम्यान घरमालकांचा मृत्यू झाला. त्यांचा मुलगा तुषार जगदीश तांबे यांनी घर रिकामे करण्यासाठी दबाव टाकला. न्यायालयामार्फत नोटीस दिली. हे प्रकरण न्यायालयात आहे. आठ सप्टेंबरला आम्ही दिल्लीत असताना बजाजनगरचे तीन पोलिस विनोद क्षीरसागर, प्रमोद मोहित आणि तुषार तांबे घरी आले. कोणतीही नोटीस न देता त्यांनी घराचे कुलूप तोडले. घरातील सर्व काही सामान गच्चीवर फेकले. लॅपटॉप, सोन्याचे दागिने, विदेश चलन याच्यासोबत शैक्षणिक कागदपत्रे आणि रिसर्चचे अहवालही गायब केले. दुसऱ्या दिवशी घरी आल्यावर हा सर्व प्रकार कळला. याची बजाजनगर पोलिसांकडे याची तक्रारही देण्यात आली. प्रथम त्यांनी घेण्यास नकार दिला. संयुक्त पोलिस आयुक्त यांच्या आदेशावरून त्यांनी एफआयआर दाखल केला. मात्र, एफआयआरमध्ये चुकीचे नमूद केले. याप्रकरणी घर मालकाच्या विरोधात ऍट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. गेल्या चार महिन्यांत पोलिसांनी आरोपीला अटक केली नाही. तपास करण्यास तयार नाही. न्याय मिळाला नाही तर आंदोलन केले जाईल असा इशारा भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल शेंडे, शहरप्रमुख मुकेश खडतकर यांनी यावेळी दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Watch Video: "घरात बसून कोणाचे चांगले होणार नाही," कॅलिफोर्नियातील 83 वर्षीय आजींनी मतदानासाठी थेट गाठली बारामती

Thane News: आनंद दिघेंच आनंद आश्रमच मुख्यमंत्री शिंदेंनी हडपल, राऊतांचा थेट आरोप

Arvind Ltd. : अरविंद लिमिटेडच्या शेअर्सकडून गुंतवणुकदारांना छप्परफाड कमाई, एका वर्षात 200% वाढ...

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Latest Marathi News Live Update : पंतप्रधान मोदींच्या रोड शो साठी महायुतीच्या नेत्यांची पुण्यात बैठक

SCROLL FOR NEXT