Police Patil Murder
Police Patil Murder Sakal
विदर्भ

Gadchiroli News : नक्षलवाद्यांकडून पोलिस पाटलाची हत्या

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली - जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम टिटोळा येथे कार्यरत पोलिस पाटलावर नक्षलवाद्यांनी सुरजागड लोहखाणीचे समर्थन केल्याचा आरोप करून त्याचा गोळ्या झाडून निर्घृण खून केला. मृत पोलिस पाटलाचे नाव लालसू धिंग्रा वेलदा (वय ६३ ) असे असून ही घटना शुक्रवार (ता. २३) रात्री ९ वाजताच्या सुमारास घटना घडली.

हेडरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जांबिया ग्रामपंचायतअंतर्गत टिटोळा गावातील पोलिस पाटील लालसू वेलदा हे स्वत:च्या घरी होते. रात्री ९ वाजता सशस्त्र नक्षलवादी त्यांच्या घरात शिरले. लालसू यांचा गोळ्या झाडून खून केला. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी क्रूरतेची परिसीमा गाठत त्यांच्या कुटुंबासमोरच त्यांचा खून केला.

या घटनेनंतर नक्षल्यांनी एका माजी जिल्हा परिषद सदस्यासह गावातील एका युवकाला व दोन लहान मुलांनाही मारहाण केल्याची माहिती आहे. खुनाच्या घटनेनंतर घटनास्थळी नक्षलवाद्यांनी पत्रक टाकून पोलिस पाटील वेलदा खाण समर्थक असल्यामुळे खून केल्याचे नमूद केले. पत्रकावर नक्षलवाद्यांच्या गडचिरोली डिव्हिजन कमिटीचा उल्लेख आहे. तसेच यासाठी स्थानिक नेते व हेडरीचे उपअधीक्षक जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही पत्रकात केला आहे.

मृत लालसू यांचा मुलगा पोलिस दलात कार्यरत आहे. एटापल्लीच्या हेडरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गाव पाटलाच्या हत्येची घटना घडली आहे. त्याठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे. मारेकऱ्यांच्या मागावर पथके रवाना केली आहेत. योग्य तो तपास करण्यात येईल, अशी माहिती पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिली आहे.

खाण समर्थकांना दिला इशारा...

आदिवासी जल, जंगल, जमीन वाचविण्यासाठी हक्काची लढाई लढत आहेत, तर हा आवाज दाबण्यासाठी काही लोक जनविरोधी काम करत आहेत. त्यांनी लवकर सुधारावे अन्यथा जनता कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत खाण समर्थकांना नक्षल्यांनी पत्रकातून इशारा दिला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT