file photo
file photo 
विदर्भ

दारुड्यांच्या हल्ल्यात पोलिस गंभीर जखमी

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : रस्त्याच्या कडेला दारू पीत असलेल्या दारुड्यांना पोलिस हवालदाराने हटकले. यावर दोन दारुड्यांनी पोलिसावर हल्ला चढवून ठार मारण्याचा प्रयत्न केला. नागरिकांनी धाव घेतल्यामुळे हवालदाराचा जीव वाचला. ही घटना गिट्टीखदान हद्दीत पोलिस तलावाजवळ घडली. अनिल भीमराव चक्रे असे हवालदाराचे नाव असून, ते शहर पोलिस मुख्यालयात कार्यरत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल चक्रे हे माजी सैनिक आहे. लष्करातून निवृत्त झाल्यानंतर ते पोलिस दलात भरती झाले. शुक्रवारी रात्री 8.15च्या सुमारास हवालदार चक्रे हे ड्यूटी संपवून घरी जात होते. त्यावेळी पोलिस तलावाजवळील रस्त्याच्या कडेला काही युवक दारू पीत बसले होते. चक्रे यांनी दुचाकी थांबवून आरोपींना "मी पोलिस आहे... तुम्ही येथे काय करीत आहात?' अशी विचारणा केली. त्यावरून हवालदार चक्रे आणि दारुड्यांमध्ये बाचाबाची झाली. आरोपी हे चक्रे यांच्या अंगावर धावून गेले. त्यामुळे चक्रे जीव वाचविण्यासाठी पळाले. आरोपींनी त्यांचा पाठलाग करून अंगावर दुचाकी नेऊन पाडले. त्याचप्रमाणे त्यांच्या डोक्‍यावर दारूची बाटली फोडून लाथा-बुक्कीने मारहाण केली. हा प्रकार तेथे असलेले प्रफुल्ल राठोड यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरड केली. त्यामुळे आरोपी पळून गेले. चक्रे यांना गंभीर अवस्थेत दंदे हॉस्पिटल येथे भरती करण्यात आले. याप्रकरणी प्रफुल्ल राठोड यांच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

iPhone Alarm issue : जगभरातील लोकांना आज उठायला झाला उशीर.. आयफोनचे अलार्म वाजलेत नाहीत! काय आहे कारण?

Rinku Singh : संघ निवडीबाबत मोठा खुलासा! BCCI च्या 'या' नियमामुळे रिंकूचे वर्ल्ड कप खेळण्याचे मिळाले स्वप्न धुळीस?

Traffic Noise: गाड्यांच्या आवाजामुळे वाढू शकतो हृदयविकार, डायबेटिस आणि स्ट्रोकचा धोका; धक्कादायक संशोधन समोर

Latest Marathi News Live Update: विदर्भ राज्य पार्टीच्या वतीने आज महाराष्ट्र दिवस हा काळा दिवस म्हणून पाळला जात आहे

SCROLL FOR NEXT