File photo
File photo 
विदर्भ

पोलिसाची पत्नीसह मुलांना डांबून मारहाण

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : एका सहायक पोलिस उपनिरीक्षकाने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी व तीन उच्च शिक्षित मुलांना घरात डांबून जबर मारहाण केली. गाडगेनगर पोलिसांनी पुढाकार घेतल्याने तीन ते चार तासांनंतर त्यांची सुटका झाली. बंदोबस्तात व्यस्त असलेल्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांना त्यासाठी चांगलाच घाम गाळावा लागला. धुमाकूळ घालणारे ए.एस.आय. हे अमरावती ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहेत. त्यांची तीनही मुले उच्चशिक्षित आहेत. काही दिवसांपासून पोलिस दलात कार्यरत या ए.एस.आय.चे पत्नी व मुलांसोबतचे वागणे अचानक बदलले. पती, पत्नी वार्धक्‍याकडे झुकत असतानाही त्याने तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन, शारीरिक, मानसिक छळणे सुरू केले होते.
शुक्रवारी (ता. 11) सायंकाळी या पोलिस अधिकाऱ्याने पुन्हा पत्नीसोबत वाद घातला. शिवीगाळ केली. एवढ्यावर त्याचे समाधान झाले नाही. तीनही उच्चशिक्षित मुलांसह पत्नीला स्वत:च्या घरात डांबून ठेवले. त्यानंतर त्यांना जबर मारहाण केली. काही वेळानंतर हे अधिकारी पत्नी, मुलांना घरातच ठेवून बाहेर आले. परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती गाडगेनगर पोलिसांना दिली. यावेळी पोलिस दुर्गादेवी मूर्ती विसर्जन मिरवणुकीसह निवडणूक बंदोबस्तात व्यस्त होते. त्यामुळे परिसरात फिरणाऱ्या सी. आर. व्हॅनमधील कर्मचाऱ्यांनी त्या पोलिस अधिकाऱ्याची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर गाडगेनगर ठाण्यातील दोन अधिकारी तेथे पोहोचले. परंतु तो पोलिस अधिकारी त्यांची सुटका करण्याच्या मन:स्थितीत नव्हता. पोलिस निरीक्षक मनीष ठाकरे मध्यरात्री बाराच्या सुमारास तेथे दाखल झाले. त्यांनी अखेर त्या एएसआयची समजूत काढून पत्नी व मुलांना सुखरूप बाहेर काढले. पत्नीच्या तक्रारीवरून गाडगेनगर ठाण्यात सहायक पोलिस उपनिरीक्षक पतीविरुद्ध कौटुंबिक हिंसाचाराचा गुन्हा दाखल झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH Live Score: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT