poor people who do not land will get says collector in amravati 
विदर्भ

भूमिहिनांना मिळणार बक्षीसपत्रात जमिनी; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

सुधीर भारती

अमरावती : 'सर्वांसाठी घरे' या योजनेंतर्गत ज्या लाभार्थ्यांकडे जागा उपलब्ध नाही, अशा लाभार्थ्यांना बक्षीसपत्राद्वारे जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडून विशेष मोहीम राबविली जाणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून सहजिल्हा निबंधकांना पत्र देण्यात आले आहे. 

केंद्र व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत भूमिहीन लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देत असताना अनेक लाभार्थ्यांकडे स्व-मालकीची जागा उपलब्ध नसते. अशा लाभार्थ्यांना घरकुलाच्या लाभापासून तसेच मंजुरीपासून वंचित राहावे लागते. अमरावती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात भूमिहीन लाभार्थी असून रक्तातील नात्यामध्ये बक्षीसपत्राद्वारे आणखी चार हजार ७१८ लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्याची सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये आधीच असलेला कामाचा ताण व सर्व्हरमधील अडचणींमुळे एका दिवशी ३० पेक्षा अधिक जास्त नोंदणी होऊ शकत नाही. तसेच सद्यःस्थितीत कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेमुळे प्रतिदिन १५ दस्तनोंदणी केली जात आहे. ही अडचण लक्षात घेता १४ तालुक्‍यांतील दुय्यम निबंधक कार्यालये २६, २७ व २८ मार्च रोजी सुरू ठेवून विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आल्या आहेत. 

अनेकदा लाभार्थ्यांकडे जमिनी उपलब्ध नसल्याने त्यांना योजनेपासून वंचित राहावे लागते. हीच अडचण लक्षात घेता आता जिल्हा प्रशासनाकडून विशेष अभियान राबविण्यात येत असून दुय्यम निबंधक कार्यालयांना सूचित करण्यात आले आहे. 
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: पेट्रोल-डिझेल स्वस्त होणार... पण कधी? पेट्रोलियम मंत्र्यांनी दिलं मोठं अपडेट

Lohagad Murder Case: हुडी घातलेला तरुण सीसीटीव्हीमध्ये दिसला अन् पोलिसांचा संशय बळावला; 'असा' लागला केतन अग्रवालच्या खुन्याचा शोध

लोकप्रियता, पैसे सगळं आहे तरीही प्राजक्ता माळीचं 'हे' स्वप्न अजूनही आहे अपूर्ण; म्हणते, 'मला मुंबईत...'

Rohit Sharma Receives Padma Shri Award: रोहित शर्माच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा; राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मश्री पुरस्कार प्रदान

Latest Marathi News Live Update : अयोध्या: देणगी चोरी प्रकरणी एसआयटीचा अहवाल सादर

SCROLL FOR NEXT