Multiplex
Multiplex 
विदर्भ

जेवणाच्या थाळीपेक्षा पॉपकॉर्न महाग

नितीन नायगांवकर

नागपूर - ‘लक्‍झरियस’ सोयींच्या नावाखाली मल्टिप्लेक्‍स संचालकांकडून ग्राहकांची लूट होत आहे. अव्वाचे सव्वा तिकीट दर असतानाही दहा रुपयांची मेहनत असलेले पॉपकॉर्न तब्बल दीडशे रुपयांना तर वीस रुपयांचा समोसा साठ रुपयांना विकला जात आहे. त्यामुळे जेवणाच्या थाळीपेक्षा पॉपकॉर्न महाग, असे म्हणायची वेळ आली आहे. 

नागपुरात दोन स्क्रीनच्या काही सिनेमागृहांसह एकूण सहा मल्टिप्लेक्‍स आहेत. यातील अगदीच एक किंवा दोन अपवाद वगळले तर इतर सर्वच ठिकाणी ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकण्याचे काम सुरू आहे. जवळपास दहा वर्षांपूर्वी नागपुरात मल्टिप्लेक्‍स संस्कृती आली. शहरात एकच मल्टिप्लेक्‍स असल्यामुळे सुरुवातीच्या काळात प्रेक्षकांनी त्याचे फारसे मनावर घेतले नाही. पण, आता नागपुरात ‘लक्‍झरियस’ सोयींचा वादा करणारे सहा मल्टिप्लेक्‍स आहेत. तरीही मल्टिप्लेक्‍समधील खाद्य पदार्थांचे दर कमी झालेले नाहीत. सिनेमागृहाचे मेन्टेनन्स भरून काढण्यासाठी खाद्य पदार्थांच्या मूळ किमतीवर जवळपास तीनशे टक्‍क्‍यांचे मार्जिन घेतले जाते, असे सूत्रांनी सांगितले.

विशेष म्हणजे मुळातच तिकिटांची किंमत दोनशे रुपयांच्या आसपास असताना महागडे खाद्य पदार्थ विकून एका ग्राहकामागे किमान पाचशे रुपये कमावण्याचे टार्गेट बाळगले जाते. त्यामुळे कुटुंबासह सिनेमा बघणाऱ्यांना किमान दोन हजारांचा भुर्दंड सोसावा लागतो. 

धोरण जाहीर होण्याची प्रतीक्षा
मुंबई उच्च न्यायालयात दाखल एका याचिकेत मल्टिप्लेक्‍समधील खाद्य पदार्थांच्या किमतींवर आक्षेप घेण्यात आला होता. पाणी व खाद्य पदार्थ आत घेऊन जाण्यास होणाऱ्या मज्जावालाही आव्हान देण्यात आले होते.

यासंदर्भात प्रेक्षकांना खाद्य पदार्थ सोबत आणण्यापासून रोखता येणार नाही, असे न्यायालयाने आदेश दिले होते. यासोबतच खाद्य पदार्थांच्या किमतींबाबतही धोरण तयार करण्याचे निर्देश दिले होते. या धोरणाची प्रतीक्षा आता सर्वांना आहे.

पॉपकॉर्न 150 रुपये
कोल्ड ड्रिंक 80 रुपये
समोसा 60 रुपये

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT Live Score: बेंगळुरूचे गोलंदाज चमकले! चिन्नास्वामी स्टेडियमवर गुजरातला 147 धावांवरच केलं ऑलआऊट

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

Weather Update : पुण्यात उन्हाचा चटका कायम राहणार; राज्यात वादळी पावसाला पोषक वातावरण

Lok Sabha Election 2024 : ४०० पार घोषणा, पण भाजप अडीचशे जागांवर अडकणार

Latest Marathi News Live Update: नारायण राणेंकडे प्रश्न सोडवण्याची हातोटी- राज ठाकरे

SCROLL FOR NEXT