बटाटा Sakal
विदर्भ

बटाटा वर्षभर महाग राहणार

उत्पादक प्रदेशातच लागवडक्षेत्र घटले

क्रिष्णा लोखंडे

अमरावती - सर्वसामान्यांच्या आहारातील मुख्य असलेला बटाटा यंदा वर्षभर महागण्याची शक्यता आहे. घाऊक बाजारात बटाट्याची आवक मंदावल्याने बटाट्याच्या दरात वाढ झाली. उत्तर प्रदेशातील आग्रा येथून सध्या बटाट्याची आवक होत आहे. यंदाच्या वर्षी बटाट्याचे दर तेजीत राहण्याची शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली आहे. किरकोळ बाजारात एक किलो बटाट्याचे दर प्रतवारीनुसार 30 ते 40 रुपये आहेत.

बटाट्याची सर्वाधिक लागवड उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात होते. आग्रा, इंदूर येथील बाजारपेठेतून देशभरात बटाटा विक्रीस पाठविण्यात येतो. आग्रा, इंदूर येथील बाजारपेठेतील घाऊक बाजारात प्रतवारीनुसार एक किलो बटाट्याला 18 ते 20 रुपये दर मिळाला आहे. आग्रा येथील बटाट्याची आवक कमी झाल्याने सध्या बाजारात बटाट्याला चांगले दर मिळत असून किरकोळ बाजारात 30 ते 40 रुपये दराने विक्री केली जात आहे.

उत्तर व मध्य प्रदेशासोबतच पुणे व नाशिकमधूनही बाजारात बटाट्याची आवक होते. मागणीच्या तुलनेत या बटाटाट्याची आवक कमी पडते. त्यामुळे परराज्यातील बटाट्याला वर्षभर मागणी असते. मार्केट यार्डातील घाऊक बाजारात दररोज उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशातून मिळून साधारणपणे 450 ते 470 क्विंटल बटाट्याची आवक होत आहे. अवकाळी पावसामुळे गावरान बटाट्याच्या लागवडीवर परिणाम झाल्याने सध्या बाजारात बटाट्याचा तुटवडा जाणवत असून परिणामी किरकोळ बाजारात वाढ झाली आहे.

बटाटा उत्पादक प्रदेशांमध्ये बटाटा लागवड 20 टक्क्यांनी कमी झाली आहे. त्यामुळे बटाट्याचे दर यंदा वर्षभर तेजीत राहणार आहेत. किरकोळ बाजारात बटाट्याचे दर साधारणपणे 30 ते 40 रुपये प्रति किलो आहेत. वाहतूक खर्च तसेच अन्य खर्च विचारात घेता किरकोळ बाजारात बटाट्याचे दर तेजीत राहणार आहेत.

- शंकर खारकर, थोक विक्रेता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satej Patil Shivaji Patil : गोकुळच्या रणधुमाळीत सतेज पाटील, शिवाजीराव पाटलांच्या घरी; महायुतीत नाराजीचा ‘वेध’ घेतल्याची चर्चा

Ichalkaranji Politics : इचलकरंजीचं राजकारण तापणार! प्रकाश आवाडे थेट लोकसभेच्या रिंगणात? खासदार माने गटाची वाढली धडधड, 'त्या' वक्तव्यानं वाढवलं टेन्शन

US H1B Visa: अमेरिकेचा H1B झटका! १ लाख ३ हजार डॉलर अतिरिक्त शुल्कामुळे नोकऱ्या परदेशात जाण्याची भीती

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Birth Death Registration Rules : जन्म-मृत्यू नोंदीला दोन वर्षे विलंब, तर न्यायालयाचे दार ठोठावे लागणार; केंद्राचे नवे कडक नियम लागू, गैरप्रकार रोखण्यासाठी पाऊल

SCROLL FOR NEXT