praveen dhanorkar
praveen dhanorkar sakal
विदर्भ

सिंदखेड राजा तहसीलदार पदी प्रवीण धानोरकर यांची नियुक्ती

सकाळ वृत्तसेवा

सिंदखेड राजा तहसीलदार पदी प्रवीण धानोरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी ता.१५ एप्रिल रोजी यांनी पदभार स्वीकारला आहे,पदभार स्वीकारताच त्यांनी कामाला सुरुवात केली आहे. शिस्तप्रिय अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे.

बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात अधीक्षक पदावर कार्यरत होते. या अगोदर त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस याठिकाणी तहसीलदार म्हणून काम केले आहे. यावेळी तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी सकाळ सोबत बोलताना सांगितले की,सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून त्यांच्या तात्काळ समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

ता.१२ एप्रिल रोजी तहसीलदार सचिन जैस्वाल यांना व त्यांच्या दोन सहकाऱ्यांना लाच प्रकरणी ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर तहसीलदार पदी कोण नियुक्त होणार असा प्रश्न होता.दरम्यान,ता.१५ एप्रिल रोजी दुपारी प्रवीण धानोरकर यांना सिंदखेड राजा तहसीलदार म्हणून रुजू होण्याचे आदेश मिळाले.

तहसीलदार प्रवीण धानोरकर यांना चहूबाजूंनी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.त्यातच लोकसभा निवडणुक,तालुक्यातील अवैध वाळू वाहतूक, शेतकऱ्यांच्या समस्या,ऑनलाईन पद्धतीने होणाऱ्या कामांचे पोर्टल बंद असल्याच्या तक्रारी विशेष म्हणजे लाच प्रकरणानंतर महसूल प्रशासनात झालेले डॅमेज कंट्रोल ते कसे सुधारणार या कडे सर्वांचे लक्ष आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: भारतीय नागरिकच माझे उत्तराधिकारी- पंतप्रधान मोदी

Cooking Tips: भाजीत तिखट जास्त झाले तर 'असे' करा कमी, चवही होईल द्विगुणित

HSC Result 2024 : मार्क कमी पडले म्हणून मुलं नाराज आहेत, पालकांच्या या गोष्टी मुलांना डिप्रेशनमध्ये जाण्यापासून वाचवतील

HSC Result : निकाल लागला; आता पुढील प्रवेशासाठी ही कागदपत्रे ठेवा तयार

Porsche Car: भारतात सनीपाजीच नाही तर धकधक गर्ल सुद्धा चालवते पोर्शे, जाणून घ्या वैशिष्ट्ये

SCROLL FOR NEXT