file photo
file photo 
विदर्भ

दिवसभर आकडेमोड; विजयाचे दावे-प्रतिदावे

सकाळ वृत्तसेवा

दिवसभर आकडेमोड; विजयाचे दावे-प्रतिदावे
नागपूर : मतदान आटोपल्यानंतर मंगळवारचा संपूर्ण दिवस उमेदवार आणि त्यांचे समर्थक आकडेमोड करण्यात व्यस्त होते. कुठल्या बूथवर किती मते मिळाली याची गोळाबेरीज करून विजयाचे दावेही अनेकांनी करणे सुरू केले. काहींनी गुरुवारी गुलाल उधळण्याची जय्यत तयारीसुद्धा केली आहे. मतदान होताच सट्टाबाजारातही तेजी आली आहे. 
शहर आणि ग्रामीण भागातील सर्व बारा विधानसभेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. भाजपने सर्व बारा जागा जिंकण्याचा दावा केला आहे. अनेक ठिकाणी झालेल्या चुरशीच्या लढतीने त्यावर सध्या कोणी विश्‍वास ठेवायला तयार नाही. मात्र लोकसभेच्या निकालाचे आकडे बघून अनेकांच्या मनात धास्ती भरली आहे. उत्तर नागपूरमध्ये कॉंग्रेसच्या विजयाची शक्‍यता वर्तविली जात आहे. नितीन राऊत समर्थक यावेळी जमेल असे सांगत आहेत. मात्र भाजपने हा दावा खोडून काढला. डॉ. मिलिंद मानेच पुन्हा विजयी होणार असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनुसूचित जमातींच्या मतांमध्ये मोठे विभाजन झाले आहे. उर्वरित साठ टक्के मते भाजपला मिळतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. पश्‍चिम नागपूरमध्ये कॉंग्रेसला आशा आहे. मागील निवडणुकीच्या तुलनेत विकास ठाकरे यांना चांगला प्रतिसाद लाभल्याचे कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. येथील आमदार सुधाकर देशमुख समर्थक मात्र आम्ही निघालो असे सांगत आहेत. दक्षिणेतसुद्धा अत्यंत चुरशीचा सामना झाला. मोहन मते, गिरीश पांडव, सतीश होले आणि प्रमोद मानमोडे चौघेही विजयाचा दावा करीत आहेत. मध्य नागपूरमध्ये मुस्लिमांची सुमारे तीस टक्के मते एमआयएमकडे वळल्याने भाजपची चिंता मिटली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम मतदारसंघात मतदानाचा टक्का असला तरी जे काही मतदान झाले त्याता भाजपचा साठ टक्के वाटा राहील असे भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ग्रामीणमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसला अनिल देशमुख यांच्याकडून मोठी आशा आहे. येथे राष्ट्रवादी विजय निश्‍चित मानत असली तरी चरणसिंग ठाकूर मुसंडी मारणार असल्याचा भाजपचा दावा आहे. सावनरेच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 
सट्टा बाजार काय म्हणतो? 
विकास कुंभारे ः 15 ते 25 पैसे 
कृष्णा खोपडे ः 08 पैसे 
मोहन मते ः 20 ते 30 पैसे 
मिलिंद माने ः 60 पैस 
नितीन राऊत ः 1 रुपया 25 पैसे 
सुधाकर देशमुख ः 30 ते 40 पैसे 
देवेंद्र फडणवीस ः 04 पैसे 
टेकचंद सावरकर ः 20 ते 30 पैसे 
सुनिल केदार ः 40 ते 60 पैसे 
अनिल देशमुख ः 25 ते 35 पैसे 
समिर मेघे ः 08 पैसे 
मल्लिकार्जुन रेड्डी ः 30 ते 40 पैसे 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

Yogi Adityanath : काँग्रेस सत्तेत आल्यास हिंदूंची विभागणी होईल - योगी आदित्यनाथ

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला पंजाबच्या गोलंदाजांनी रोखलं अन् फलंदाजांनी ठोकलं; ऋतुराजसेनेचा बालेकिल्ल्यात दुसरा पराभव

Loksabha election 2024 : जेडीयूचे माजी प्रदेशाध्यक्ष शशांक राव यांचा भाजपात प्रवेश; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती

SCROLL FOR NEXT