विदर्भ

Loksabha 2019 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची वर्ध्यात २८ ला जाहीर सभा 

सकाळवृत्तसेवा

वर्धा - लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात गुरुवारी (ता. २८) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वर्धा येथे भाजप उमेदवाराच्या प्रचाराकरिता जाहीर सभा घेणार आहेत. मागील निवडणुकीतही विद्यमान खासदार रामदास तडस यांच्या प्रचाराकरिता मोदी यांनी सभा घेतली होती. या निवडणुकीच्या अनुषंगाने मतदारसंघात पूर्ण तयारी झाली असून, प्रचाराकरिता ५० हजार कार्यकर्ते सज्ज असल्याची माहिती भाजपचे लोकसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख सुधीर दिवे यांनी बुधवारी (ता. २०) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी खासदार रामदास तडस, आमदार डॉ. पंकज भोयर, माजी खासदार सुरेश वाघमारे, डॉ. शिरीष गोडे, जिल्हाध्यक्ष राजेश बकाणे, नगराध्यक्ष अतुल तराळे, मिलिंद भेंडे, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेश सराफ, रिपाइं (आठवले)चे जिल्हाध्यक्ष विजय आगलावे यांची उपस्थिती होती.

वर्धा लोकसभा मतदारसंघाकरिता भाजप, शिवसेना व रिपाइं यांची एकत्रित निवडणूक संचालन समिती गठित करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये खासदार रामदास तडस, राज्यमंत्री प्रवीण पोटे, राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, आजी-माजी खासदार, आमदार, भाजपचे सर्व नगराध्यक्ष, जिल्हा परिषद पंचायत समितींचे अध्यक्ष, सभापती, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, शिवसेना, रिपाइंचे पदाधिकारी यांचा समावेश आहे. यासोबत सूक्ष्म नियोजन करण्यासाठी वेगवेगळ्या ३१ विषयांच्या व्यवस्थापन समिती गठित केल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

वर्ध्यातून फुंकणार रणशिंग
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ वर्ध्यात फोडणार आहेत. महात्मा गांधी यांच्या कर्मभूमीतून त्यांना अभिवादन करीत ते गांधी परिवाराविरुद्ध रणशिंग फुंकणार आहेत. काँग्रेसची उमेदवारी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. चारुलता राव टोकस यांना जाहीर झाली आहे. त्यांच्या आई दिवंगत प्रभा राव या काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या होत्या. या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसकडूनही शीर्षस्थ नेतृत्व येथे सभा घेण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT