Doctors 
विदर्भ

खासगी रुग्णालयांच्या शुल्कावर टाच...आठवड्यातून केल्या जाणार ऑडिट, सात सदस्यीय पथक गठित

कृष्णा लोखंडे

अमरावती :  कोरोनाबाधित रुग्णांकडून शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारल्या जात असल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांकडे आल्या आहेत. खासगी रुग्णालयांतून हा प्रकार होऊ लागल्याने मनपा आयुक्तांनी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करून आठवड्यातून एकवेळा खासगी रुग्णालयातील उपचारासाठी आकारण्यात येणाऱ्या शुल्काचे ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय रुग्णालयासोबत शहरातील काही खासगी रुग्णालयांना उपचार करण्याची मुभा देण्यात आली आहे. शासनाने त्यासाठी ठराविक शुल्क निश्‍चित करून दिले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर त्यांची श्रेणी आखून उपचाराचे निर्देश आहेत. नव्या धोरणानुसार सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृहविलगीकरणाचा मार्ग उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर हायरिस्कमधील रुग्णांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात येते. त्यांना शासकीय कोविड रुग्णालयात उपचार देण्यासोबतच इच्छेनुसार खासगी रुग्णालयेदेखील उपलब्ध करून देण्यात आली आहेत. शहराच्या चार खासगी रुग्णालयांत ही व्यवस्था आहे. अनेक रुग्ण या रुग्णालयांतून दुरुस्त होऊन घरी परतले आहेत.

काही रुग्णांनी त्यांच्याकडून शासनाने निर्धारित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक शुल्क आकारण्यात आल्याचे व आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी केलेल्या आहेत. त्याची शहानिशा करण्यात येत असून मनपा आयुक्तांनी आता महापालिकेतील लेखापरीक्षक राम चव्हाण, वैद्यकीय अधिकारी (स्वच्छता) डॉ. सीमा नैताम, डॉ. सुनील वाखोरे, डॉ. सचिन सानप, धीरज माकोडे, जी. एस. मिरानी व व्ही. यू. पिंपळे यांची लेखापरीक्षण (ऑडिट) करण्यासाठी नियुक्ती केली आहे. आठवड्यातून एक वेळा सर्व खासगी रुग्णालयांतील रुग्णांकडून आकारण्यात येत असलेल्या शुल्काची माहिती घेण्याची व ऑडिट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे रुग्णांकडून आकारण्यात येणाऱ्या अतिरिक्त शुल्कांवर टाच येण्यासोबतच त्यांना दिलासा मिळू शकणार आहे.

संपादन - सुस्मिता वडतिले 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: कुत्रा भुंकल्याने वाद पेटला; वाघोलीत दोन बहिणींवर दगड, सळई अन् लाथाबुक्क्यांनी हल्ला

Premium|Mithu Sen Artist : भाषा आणि रूढींना बगल देणारी कलावंत...

Pune Family Crime News : आईला बाहेर पाठवलं, ‘आधारकार्ड आणतो’ म्हणत घरी आला; मामाचा खून करून भाच्याची आत्महत्या

Sex Racket Busted : वाराणसीत खानावळ-बस बुकिंगच्या आडून 'कोडवर्ड' द्वारे सुरु होता वेश्याव्यवसाय; गेस्ट हाऊसवर छापा, ४ महिलांसह ७ जण ताब्यात

ICAI Global Expansion : जगातील ५० देशांत आयसीएआयचे जाळे निर्माण करण्याचे उद्दिष्ट आयसीएआयच्या राष्ट्रीय परिषदेत माहिती

SCROLL FOR NEXT