चिमूर : कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अमृता फडणवीस.
चिमूर : कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अमृता फडणवीस.  
विदर्भ

प्रत्येकाच्या प्रगतीत देशाची प्रगती : अमृता फडणवीस

सकाळ वृत्तसेवा

चिमूर (जि. चंद्रपूर) : प्रत्येक महिलेने आपल्या परिवारातील मुलींच्या शिक्षणाकडे लक्ष द्यावे. गावासाठी, तालुक्‍यासाठी तथा जिल्ह्यासाठी उद्योगशील व्हावे. ज्यामुळे तुमच्या गावाचे, जिल्ह्याचे नाव जगभर पोहोचेल. प्रत्येकाच्या प्रगतीत देशाची प्रगती आहे. ही प्रगती प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे, असे प्रतिपादन अमृता फडणवीस यांनी केले.
भारतीय स्वांतत्र्य लढ्यात चिमूरची 16 ऑगस्टची क्रांती महत्त्वपूर्ण आहे. या क्रांतिलढ्यातील वीर शहिदांचे स्मरण करण्याकरिता शहीद स्मृतिदिन सोहळा, अटलबिहारी वाजपेयी यांचा प्रथम स्मृतिदिन तथा रक्षाबंधन कार्यक्रम बीपीएड महाविद्यालयात शनिवारी (ता. 16) पार पडला. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. आमदार कीर्तिकुमार भांगडिया यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. याप्रसंगी खासदार अशोक नेते, माजी विधानसभा अध्यक्ष मितेश भांगडिया, आमदार कीर्तिकुमार भांगडिया, भाजपचे राज्य संघटक भुसारी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष देवराव भोंगळे, उपाध्यक्ष क्रिष्णा सहारे, ज्येष्ठ भाजप नेते वसंत वारजूरकर यांची उपस्थिती होती. शहीद बालाजी रायपूरकर यांचे परिजनांचा, स्वातंत्र्य संग्राम सैनिकांच्या परिवारांचा सत्कार खासदार अशोक नेते यांच्या हस्ते करण्यात आला. संचालन पंचायत समिती सदस्य अजहर शेख यांनी केले. याप्रसंगी श्रीहरी बालाजी देवस्थानकडून पूरग्रस्तांकरिता 5 लाख 11 हजार रुपयांचा धनादेश अमृता फडणवीस यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs LSG : अभिषेक शर्माचे SRH साठी सर्वात वेगवान अर्धशतक; 10 षटकात लखनौचं आव्हान केलं पार

Mumbai News: रुग्णवाहिका खरेदी निविदा प्रक्रिया भोवणार,उच्च न्यायालयाने घेतली दखल, भूमिका स्पष्ट करण्याचे दिले निर्देश

Mumbai Airport: तब्बल इतक्या वेळ मुंबई विमानतळ रहाणार बंद, जाणून घ्या काय आहे महत्वाचं कारण

Police Bharti 2023 : पोलिस भरतीमध्ये एकापेक्षा जास्त अर्ज केलेल्या उमेदवारांना द्यावं लागणार हमीपत्र; आदेशात नेमकं काय म्हटलंय?

Pune Crime : मतदानानंतर वारजे परिसरात गोळीबार, दोघे अल्पवयीन ताब्यात

SCROLL FOR NEXT