सविता राऊळकर
सविता राऊळकर  
विदर्भ

वाचन विकासातून साधली विद्यार्थ्यांची प्रगती

मंगेश गोमासे

वाचन विकासातून साधली विद्यार्थ्यांची प्रगती
नागपूर : विद्यार्थी वाचनात मागे पडू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या शिक्षिकेने वाचन विकास प्रकल्पातून शंभर टक्के वाचन विकासाची किमया साधली आहे. कार्यरत असलेल्या शाळेतच नव्हे, तर विभागातील सहा जिल्ह्यांतील शिक्षकांना या प्रयोगाचे प्रशिक्षण देत, विद्यार्थ्यांना वाचनात पारंगत करण्याचा मंत्र दिला आहे.
सविता राऊळकर असे या शिक्षिकेचे नाव आहे. त्या बेसा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहेत. अभ्यासात हुशार असलेल्या विद्यार्थ्यांचाही पूर्णपणे वाचन विकास झाला असे म्हणता येत नाही. अनेकांना स्पष्टपणे वाचता येत नसल्याची बाब शाळांमध्ये निदर्शनास येते. साधारणत: पहिलीपासूनच वाचनाची सवय न लागल्यास त्याचा परिणाम अभ्यासावरही होतो. भविष्यात त्याचा परिणाम गुणवत्तेवर होत असल्याने त्याला वाचनाची आवड लावणे महत्त्वाचे ठरते. यातूनच सविता राऊळकर यांनी गतवर्षी "एकच ध्यास वाचन विकास' हा प्रकल्प तयार केला.
आपल्या नावीन्यपूर्ण उपक्रमाने हिंदी भाषक विद्यार्थ्यांना त्यांनी मराठीत पारंगत केले आहे. विद्यार्थ्यांची वाचनक्षमता विकसित व्हावी, यासाठी वाचनातून आकलनशक्ती वाढविणे, आत्मविश्‍वास उंचावणे, शैक्षणिक विकास साधण्यावर त्यांचा भर आहे. राऊळकर यांनी तयार केलेल्या प्रकल्पात वाचन विकासाचे टप्पे तयार करून कृती कार्यक्रमाची आखणी केली. हा प्रयोग केवळ आपल्या शाळेपुरता न ठेवता, विद्या प्राधिकरणाच्या माध्यमातून तालुकास्तरावर प्रशिक्षण दिले. या प्रशिक्षणात विभागाच्या सहा जिल्ह्यांतील शिक्षकांनी हजेरी लावली होती.
असा केला जातो विकास
त्यांना आनंद देणाऱ्या गोष्टीतून हळुवारपणे नेणे, श्रवण, भाषण, संभाषणातून विविधांगी उपक्रम राबविले. यात मातीचे गोळे तयार करणे, पेपरचा बॉल, रेषेवरून चालणे, उड्या मारणे ते शेंगा सोलणे, रांगोळी यांसारख्या कृतीही करवून घेतल्या. या प्रकाराने त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांची शंभर टक्के वाचनक्षमता विकसित केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT