Tolenandgav School Sakal
विदर्भ

टोलेनांदगावात झाले चिमुकल्या विद्यार्थ्यांचे आंदोलन

गोंडपिपरी तालुक्यातील टोलेनांदगावात जि. प. शाळा आहे. या शाळेत एक ते चौथी पर्यतचे विद्यार्थी शिकतात.

संदीप रायपूरे

गोंडपिपरी तालुक्यातील टोलेनांदगावात जि. प. शाळा आहे. या शाळेत एक ते चौथी पर्यतचे विद्यार्थी शिकतात.

गोंडपिपरी : पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या टोलेनांदगावात जि. प. शाळेतील एका शिक्षकाला प्रतिनियुक्तीच्या नावावर हिवरा गावात पाठविले. चार वर्ग अनं एकच शिक्षक अशी अवस्था निर्माण झाल्याने संतापलेल्या चिमुकल्या विद्यार्थ्यांनी गावकऱ्यांच्या, शाळा व्यवस्थापन समितीच्या मदतीन आज शाळा बंद ठेउन निषेध केला. शिक्षक येईपर्यत शाळा खोलणार नाही अशी भुमिका घेतली. या प्रकरणात शिक्षण प्रशासनाच्या भुमिकेवरही आता प्रश्नचिन्ह व्यक्त केल्या जात आहेत.

गोंडपिपरी तालुक्यातील टोलेनांदगावात जि. प. शाळा आहे. या शाळेत एक ते चौथी पर्यतचे विद्यार्थी शिकतात. शाळेत दोन शिक्षक कार्यरत आहेत. यापैकी उईके नामक शिक्षकाला हिवऱ्याच्या शाळेत प्रतिनियुक्तीवर पाठविण्यात आले. यामुळे शाळेत केवळ एकच शिक्षक उरला. अशा अवस्थेत विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणीक नुकसान होत होते. प्रशासनाकडे वारंवार मागणी करूनही काहीच फरक पडला नाही. आणी मग गावकऱ्यांनी व शाळा व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत आज शाळा बंद केली. शाळेच्या मेन गेटवर कुलुप ठोकण्यात आले. कुलुपावार एक खरडा चिपकविण्यात आला. यात अनेक दिवस मागणी करूनही पुर्ण होत नसल्याने आम्हाला हा मार्ग अवलंबविण्यात यावा लागला असे लिहीण्यात आले. दरम्यान शाळेला कुलूप ठोकल्यानंतर एकही संबधीत अधिकारी न आल्याने गावकऱ्याचा संताप वाढला आहे.

आम्हाला शिक्षक हवा असे म्हणत आज टोलेनांदगावात जि.प. शाळेत शिकणारे विद्यार्थ्यांनी देखील आंदोलन केले. शाळेच्या गेटसमोर ठिया देत त्यांनी आपल्या मागणीचा आवाज बुलंद केला.

शिक्षकाला प्रतिनियुक्ती देत दुस़या गावाला पाठविणे अनं आमच्या शाळेला केवळ एकच शिक्षक ठेवणे हा मोठा अन्याय आहे. वारंवार प्रशासनाला माहिती देउन मागणी करून या प्रश्न न सुटल्याने आम्हाला आज शाळेला कुलूप ठोकावा लागला. मागणी पुर्ण होउपर्यत शाळेला कुलुप कायम राहिल.

- अनील कोरडे, माजी उपसरपंच, टोलेनांदगाव.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

School Trip Rules: शिक्षकांसह विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! शैक्षणिक सहलीसाठी नवे नियम लागू

CNG Supply: मुंबईतील सीएनजी पुरवठा कधी सुरळीत होणार? एमजीएलने तारीख अन् वेळच सांगितली, वाहनचालकांना मोठा दिलासा

Numerology Predictions : 'या' तारखेला जन्मलेले लोक असतात जास्त निरोगी..वयाची साठी पार केली तर जडत नाहीत आजार

Latest Marathi Breaking News: इचलकरंजी महापालिकेच्या आरक्षणात सहा प्रभागात फेरबदल

Pune News : पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंतापदासाठी एक डिसेंबरला परिक्षा

SCROLL FOR NEXT