ceo vaibhav waghmare washim sakal
विदर्भ

Washim : सीईओ वाघमारे यांची बदली नाही...वाशीमकरांना दिलासा, आंदोलकांकडून आंदोलन तात्पुरते स्थगित

Washim : वाशिम जिल्ह्यातील सीईओ वैभव वाघमारे यांच्या बदलीच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. शासनाच्या वतीने वाघमारे यांची बदली होणार नसल्याचे आश्वासन दिल्यामुळे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाशीम : जि. प. चे कर्तव्यदक्ष सीईओ वैभव वाघमारे यांची बदली करू नये, यासाठी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठाण मांडून बसलेल्या वाशीम जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळाल्याने त्यांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले आहे.

महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ''सीईओ वाघमारे यांची बदली करण्यात येणार नाही'' असे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

मागील काही दिवसापासून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या बदलीच्या मागणीसाठी जिल्हा परिषदेच्या कर्मचारी संघटनांच्या वतीने काम बंद आंदोलन पुकारण्यात आले होते. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाला जिल्ह्यातील सामान्य नागरिकांनी तीव्र आक्षेप घेत वाघमारे यांना पाठिंबा दर्शविला होता. यासाठी समाज माध्यमातून ''वुई सपोर्ट सीईओ वाघमारे'' असे कॅम्पेनिंग चालवले गेले. सीईओ वाघमारे यांना कर्मचारी संघटनांचा विरोध आणि दुसरीकडे सीईओ यांना जिल्ह्यातील सामान्य नागरिकांचा वाढता पाठिंबा, यामुळे संपूर्ण जिल्हा ढवळून निघाला होता.

आज कर्मचारी संघटनेच्या आंदोलनामध्ये शिक्षक व ग्रामसेवकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. याला प्रत्युत्तर देण्यासाठी ''वुई सपोर्ट सीईओ'' या ग्रुपच्या माध्यमातून संघटित झालेल्या तळागाळातील सामान्य लोकांनी एकत्र येऊन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे दिले. यामध्ये जिल्ह्यातील सामाजिक संघटनांनी, राजकीय पक्षांनी सहभाग घेऊन सीईओ वाघमारे यांचे समर्थन केले.

कर्मचारी संघटनेकडे संख्या बळ आणि आर्थिक बळ मोठे असूनही वाशिमच्या सामान्य जनतेने त्यांना आंदोलन मागे घ्यायला भाग पाडले. धरणे आंदोलनकर्त्यांना नागरिकांचे प्रतिनिधी म्हणून एका शिष्टमंडळाने महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. ''सीईओ वाघमारे यांची बदली करण्यात येणार नाही'' असे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आल्यामुळे हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.

प्रधान सचिव एकनाथ डवले यांची मध्यस्थी

जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्यावतीने १ पासून मुख्य कार्यकारी अधिकारी जि प वाशिम यांच्या विरोधात जिल्ह्यातील सर्व ३४ संघटना यांनी सामुहिक रजा आंदोलन सुरू केले होते. आज आंदोलनाचा तिसरा दिवस होता, आज आंदोलनाला संभाजी ब्रिगेड अमरावती विभागीय अध्यक्ष गजानन भोयर आणि जिल्हाध्यक्ष अनिल सुर्वे यांनी भेट देऊन जाहीर समर्थन केले.

आंदोलनाच्या दरम्यान दुपारी १ वाजता महाराष्ट्र राज्याचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांनी वाशीमच्या सर्किट हाऊसवर चर्चेसाठी निमंत्रण दिले, त्यावरून जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या वतीने (सर्व ३४ संघटना) प्रमुख शिष्टमंडळ म्हणून विजय धुमाळे, आत्माराम नवघरे, अरुण इंगळे, विजय मनवर,रा. सु. इंगळे, निलेश कानडे, नाना तुर्के, अमोल कापसे, दत्तराव इढोळे, विनोद घुगे, शत्रुघ्न गवळी डवले यांना भेटून चर्चा केली. चर्चेमध्ये निवेदनानुसार मुद्देनिहाय चर्चा झाली. सदर निवेदनाची नोंद घेऊन निवेदनानुसार मागण्या मान्य केल्या व कामांमध्ये सर्व बाबींची सुधारणा होईल असे मान्य झाल्यावर सर्व संघटनांनी चर्चा करून आज तिसऱ्या दिवशी सामूहिक रजा आंदोलन पुढील आदेशापर्यंत स्थगित केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT