police
police 
विदर्भ

पीएसआय पदाचा तिढा: पोलिस महासंचालकांची सकारात्मकता

अनिल कांबळे

नागपूर : राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेली अर्हता परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी राज्याचे पोलिस महासंचालक दत्ता पळसलगीकर यांची भेट घेतली. जवळपास 12 हजार पोलिस कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधीत्व करीत पीएसआय पदाचा प्रश्‍न त्यांच्यासमोर मांडला.

महासंचालकांनीही तेवढीच तत्परता दाखवत पोलिस कर्मचाऱ्यांना सकारात्मक संकेत दिलेत. त्यामुळे राज्यातील सर्वच जिल्ह्यातील पोलिस दलात आनंदाचे वातावरण निर्माण निर्माण झाले आहे. गेल्या 2013 मध्ये राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलिस कर्मचाऱ्यांची अर्हता परीक्षा घेण्यात आली होती. यामध्ये उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना 2018 पर्यंत तब्बल नऊ वेळा भरती प्रक्रियेत सहभागी करून घेत पीएसआय म्हणून नियुक्‍ती देण्यात आली. मात्र, एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या मोठी असल्यामुळे पीएसआय पद देणे अडचणीचे ठरत होते. सेवाजेष्ठता यादीसुद्धा सदोष होती. त्यामुळे अनेकांच्या खांद्यावर आतापर्यंत "टू स्टार' लागलेले नाही. त्यामुळे राज्य पोलिस क्रीडा स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या पोलिस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांची पोलिस कर्मचाऱ्यांच्या एका शिष्टमंडळाने भेट घेतली.

आपल्या समस्या त्यांना सांगितल्या. त्यावर महासंचालकांनी या प्रकरणात लक्ष देऊ आणि लवकरच तोडगा काढू, अशी सकारात्मकता दाखवली. त्यामुळे जवळपास 12 हजार पोलिस हवालदारांच्या चेहऱ्यांवर नवचैतन्य निर्माण झाले आहे.

कर्मचारी ते अधिकारी बनण्याची संधी
तत्कालिन पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी "डीपार्टमेंटल एक्‍झाम'ची संकल्पना काढली होती. त्या अंतर्गत पोलिस दलात कठोर मेहनत आणि प्रामाणिक सेवा प्रदान करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याला अधिकारी बनण्याची संधी मिळावी, यासाठी प्रयत्न केले होते. त्याचाच परिपाक म्हणून एमपीएससीची पात्रता 2013 मध्ये परीक्षा घेण्यात आली होती.

एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊन सहा वर्षे झाले. परंतु अद्याप पीएसआय म्हणून नियुक्‍ती मिळाली नाही. त्यामुळे अजुनही हवालदार म्हणून काम करीत आहे. त्याचे दुःख मनाला नेहमी बोचते. मात्र, पोलिस महासंचालक आणि मुख्यमंत्र्यांकडून खूप मोठी आशा आहे. आम्ही अजुनही पीएसआय म्हणून नियुक्‍तीच्या प्रतीक्षेत आहोत. लवकरच यातून मार्ग निघेल, अशी आशा आहे.
-पोलिस हवालदार (नागपूर आयुक्‍तालय)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT