file photo
file photo 
विदर्भ

पीएसआय संजय टेमगिरे फरार?

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : तक्रारदार युवकाच्या बहिणीला शारीरिक संबंधाची मागणी करणारा अजनी पोलिस ठाण्याचा पीएसआय संजय टेमगिरे गुन्हा दाखल होताच फरार झाला आहे. टेमगिरेवर नव्याने ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा शोध घेत असून तो मूळ गावीसुद्धा सापडला नाही. एका पीएसआय अधिकाऱ्याच्या घाणेरड्या कृत्यामुळे नागपूर शहर पोलिस दलाची प्रतिमा मलिन झाली आहे.
पोलिस आयुक्‍त डॉ. भूषणकुमार उपाध्याय हे शहर पोलिस दलात पारदर्शक कारभार आणि लोकाभिमुख पोलिसिंग करण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र, त्यांच्या प्रयत्नांना संजय टेमगिरेसारखे पोलिस अधिकारी काळिमा फासत आहेत. 21 मे रोजी नवीन बाभुळखेडा येथील धोबीघाट येथे लग्नाच्या स्वागतसमारंभात डीजेवर नाचत असताना धक्‍का लागल्याच्या कारणावरून आशुतोष बाबुलाल वर्मा (25) याचा आरोपी मनीष अशोक गवतेल (20), ललित ऊर्फ काल्या यांनी खून केला होता. या हल्ल्यात शुभम हा मध्यस्थी करीत असताना जखमी झाला होता. या प्रकरणाचा तपास अजनीचे पीएसआय संजय टेमगिरे याच्याकडे होता. 27 मे ते 13 जूनदरम्यान टेमगिरेने पीडित 25 वर्षीय तरुणीला फोन करून तिच्या भावाचे कपडे घेऊन पोलिस ठाण्यात बोलविले. त्यानंतर वेगवेगळ्या बहाण्याने तिला पोलिस ठाण्याबाहेर बोलावून रात्री उशिरापर्यंत तिला थांबवून ठेवले. 13 जून रोजी टेमगिरे यांनी पीडित तरुणीला सिनेमा पाहण्यासाठी बोलविले. त्याचप्रमाणे सिनेमाच्या तिकिटा आणि फोटो तरुणीच्या व्हॉट्‌सऍपवर पाठविल्या. या प्रकरणी तरुणीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसांनी पीएसआय टेमगिरे याच्यावर 354 (ड) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uma Ramanan: तामिळ चित्रपटसृष्टीचा आवाज हरपला, दिग्गज गायिकेचे निधन

Prajwal Revanna: 'सेक्स टेप' प्रकरणी प्रज्वल रेवण्णा यांच्याविरोधात ग्लोबल लूकआऊट नोटीस जारी

PM Narendra Modi : 'मोदींचे निधन झाले तर कोणी पंतप्रधानच होणार नाही का?' काँग्रेस आमदाराचे पुन्हा वादग्रस्त विधान

Mumbai Loksabha: कोण मारणार मुंबईत बाजी? ठाकरेंचा आत्मविश्वास 'सातवे आस्मान'पे, भाजप मात्र संभ्रमात

Latest Marathi News Live Update : दिंडोरीत बंडखोरी, हरिश्चंद्र चव्हाण भरणार अपक्ष अर्ज

SCROLL FOR NEXT