file photo
file photo 
विदर्भ

पैनगंगा अभयारण्यातील प्रश्न मार्गी लागणार

सकाळ वृत्तसेवा

उमरखेड (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील पैनगंगा अभयारण्यातील वीज, रस्ते, पाणी, शाळांमधील शिक्षकांची रिक्तपदे, भोगवटदार क्रमांक दोनच्या जमिनी वर्ग एक करणे आदी प्रश्न आता लवकरच मार्गी लागणार आहेत. याबाबत येथील तहसील कार्यालयात शुक्रवारी (ता.5) आमदारांसह इतर लोकप्रतिनिधी व जिल्हाधिकारी यांची बैठक झाली. त्यात हा सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
पैनगंगा अभयारण्यातील चाळीस वनग्रामातील जनतेच्या समस्या स्वातंत्र्यानंतर शासन व प्रशासन दरबारी धूळखात पडलेल्या असताना पाच वर्षांत काही प्रमाणात धूळ बाजूला सारण्याचा प्रयत्न झाला. तरीसुद्धा अद्यापपावेतो अनेक समस्या मार्गी न लावल्याने मागील लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय त्या भागातील जनतेने घेतला होता. परंतु, प्रशासनाने मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वस्त केल्याने बहिष्कार मागे घेण्यात आला. त्या अनुषंगाने आमदार राजेंद्र नजरधने यांनी माजी आमदार उत्तम इंगळे यांच्यासह जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, कार्यकारी अभियंता लाखाणी यांच्या उपस्थितीत पैनगंगा अभयारण्यातील प्रश्नांबाबत बैठक घेतली. त्यात अभयारण्यातील अनेक समस्या मार्गी लावण्यात आल्या. सोनदाबी, बोरीवन, थेरडी, गाडी, खरबी या रस्त्यांसाठी 11 कोटी रुपये, तर दराटी, मोरचंडी, बिटरगाव या रस्त्यांसाठी आठ कोटी रुपये शासकीय योजनेतून त्वरित देण्याचे अभिवचन जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी दिले. या भागातील वीजसमस्या मार्गी लावण्यासाठी भवानी येथे स्वतंत्र फिडर बसवून खरबी येथे स्वतंत्र लाइन टाकणार असून, मानव मिशनच्या दोन बस सुरू करण्याचेही सांगण्यात आले. सोनदाबी, थेरडी व कोरटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी वैद्यकीय अधीक्षक व कर्मचारी, जिल्हा परिषद शाळेतील रिक्त असलेली शिक्षकांची पदे भरणार असल्याचे सांगण्यात आले. बंदी भागातील लोकांची प्रमुख असलेली भोगवटदार क्रमांक दोनच्या जमिनी वर्ग एक करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दाखविला. वन्यप्राण्यांपासून शेतीची सुरक्षा करण्यासाठी सोलर झटका, खनिकर्म निधीतून रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. सोनदाबी ते बिटरगाव हा रस्ता चार कोटी रुपये खर्चून नवीन तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करून लवकरच तयार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष सुनील टाक, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, तहसीलदार रुपेश खंडारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कलंत्री, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे यांच्यासह वीज महावितरण, वनविभाग, ऊर्ध्व पैनगंगा प्रकल्प आदी सर्व विभागांतील अधिकारी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT