Women-Gambling
Women-Gambling 
विदर्भ

महिलांच्या जुगारावर छापा

सकाळवृत्तसेवा

चौघींना अटक; दोघी गेल्या पळून 
नागपूर - जरीपटका येथे महिलांच्या जुगारावर पोलिसांनी छापा टाकून चार महिलांना ताब्यात घेतले. दोन महिलांनी खिडकीतून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी येथून ३० हजार रोख व पत्ते ताब्यात घेतले आहे. शहरात महिलांच्या जुगारअड्डा प्रथमच उघडकीस आल्याने अनेकांना धक्का बसला आहे. विशेष म्हणजे जुगार खेळताना अटक करण्यात आलेल्या महिला श्रीमंत घरच्या आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेणू साधवानी, वीणा रिहानी, सीमा सिधवानी आणि ज्योती हरजानी (सर्व रा. दयानंद पार्कजवळ, जरीपटका) असे जुगार खेळताना पकडण्यात आलेल्या महिलांची नावे आहेत. जरीपटका परिसरातील तेटिया चौकात एका घरी महिलांचा जुगारअड्डा अनेक दिवसांपासून चालत असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारावर जरीपटक्‍याचे पोलिस उपनिरीक्षक उपनिरीक्षक राहुल दवेकर, आसिफ शेख, वैशाली चरपे, रजनी रायपुरे आणि राजेश साखरे यांनी मंगळवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास रेणू साधवानी हिच्या घरी छापा टाकला. त्यावेळी महिला पत्त्यांसह जुगार खेळताना दिसल्या.

पोलिसांची चाहूल लागताच दोन महिला घराच्या मागील दाराने व खिडकीतून उडी मारून पळून गेल्या. पोलिसांनी घटनास्थळावरून ३० हजार ६६० रुपये रोख, पत्ते व इतर साहित्य जप्त केले.

गेल्या अनेक महिन्यांपासून रेणू साधवानी ही घरात जुगारअड्‌डा चालवीत होती. तिने वॉट्‌सॲप ग्रुपच्या माध्यमातून जुगारअड्‌डा सुरू केला होता. सर्व महिला व्यापारीवर्गाशी जुळलेल्या आहेत. मंगळवारी अक्षयतृतीया असल्यामुळे जुगार खेळणाऱ्या महिलांची संख्या कमी होती. त्यामुळे केवळ सहाच महिला जुगार खेळताना आढळल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madha Loksabha: मावळत्या सूर्याची शपथ अन् शरद पवार... मोदींची टीका; जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण?

Latest Marathi News Live Update : प्रज्वल रेवण्णा स्कॅंडल प्रकरणात जनता दल सेक्युलर पक्षाची मोठी कारवाई

मोहन जोशींना झाला होता मालिका सोडल्याचा पश्चाताप; जाणून घ्या शूटिंगदरम्यानचा 'तो' भन्नाट किस्सा...

Aamir Khan: "मुसलमान असल्यामुळे मला नमस्कार करण्याची सवय नव्हती पण..."; आमिरनं सांगितला पंजाबमधील 'तो' किस्सा

वॉशिंग्टन पोस्टच्या रिपोर्टमधील गंभीर आरोपांवर भारताचे सडेतोड उत्तर; काय करण्यात आलाय दावा?

SCROLL FOR NEXT