Manisha-Chaube
Manisha-Chaube 
विदर्भ

रेल्वे बंगल्यात भरते पक्ष्यांची शाळा

सकाळवृत्तसेवा

नागपूर - रेल्वे अधिकाऱ्याच्या पत्नी असणाऱ्या मनीषा चौबे यांचे निसर्गावर निस्सीम प्रेम. त्या निसर्गाला घर आणि झाडं, फुलं, पक्ष्यांना कुटुंबातील सदस्य मानून त्यांची काळजी घेतात. त्यांच्या प्रयत्नांमुळे रेल्वे बंगल्याच्या परिसरात वेगवेगळी फूलझाडे बहरली असून, अंगणात वेगवेगळ्या प्रजातींच्या पक्ष्यांची शाळा भरते. घरात निघणाऱ्या कचऱ्यापासूनच त्या खत तयार करून अंगणातील झाडांना ऊर्जा प्रदान करतात. वेस्टपासून तयार होणाऱ्या बेस्ट खतासाठी जनजागृती करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखविला. 

‘झाडे लावा, झाडे जगवा’ हा आज केवळ सुविचार ठरला आहे. त्याचा कुठेही अवलंब होताना दिसत नाही. एम. कॉमपर्यंतचे शिक्षण झालेल्या मनीषा चौबे मात्र त्याला अपवाद आहेत. पोटच्या मुलांप्रमाणे त्या झाडांची काळजी घेतात. त्यांचा संपूर्ण दिवस फुलं, झाडं आणि पक्ष्यांच्या सानिध्यात जातो. पक्ष्यांसाठी त्यांनी विविध प्रकारची घरटी तयार केली आहेत. निसर्गसंवर्धनाचा ध्यास असला तरी त्यासाठी त्या फारसा खर्च मात्र करीत नाही. घराघरांतून निघणाऱ्या टाकाऊ कचऱ्यापासून त्या खत तयार करतात. एका मोठ्या चिनीमातीच्या भरणीत साठवून  आठवडाभराच्या प्रक्रियेनंतर कचऱ्याचे खतात रूपांतर होते. ही प्रक्रिया होत असताना आणि झाल्यानंतरही कुठल्याही प्रकारची दुर्गंधी सुटत नाही. घराघरांत ही माहिती पोहोचावी यासाठी त्या जनजागृती करीत आहेत. या विषयावर त्या नि:शुल्क कार्यशाळासुद्धा घेत असतात. या कार्याची दखल घेऊन नागपूर गार्डन क्‍लब आणि फ्रेण्ड्‌स इंटरनॅशनल या संस्थांकडून त्यांना पुरस्कृतही करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोकसभेचा महाराष्ट्ररंग

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 05 मे 2024

IPL 2024 RCB vs GT: जोशुआ लिटिलनं दिलेलं टेंशन, पण बेंगळुरूने विजयाचा चौकार मारत प्लेऑफच्या आशाही ठेवल्या जिंवत

कहाणी वेदनादायी आयुष्याची

दलितांच्या जीवनाचं वास्तव चित्रण

SCROLL FOR NEXT