Raj Thackeray Esakal
विदर्भ

Raj Thackeray: विदर्भात मनसेची मोठी रणनीती; राज ठाकरे कोणाला बनवणार आमदार? कार्यकर्त्यांना काय दिला संदेश?

Latest Maharashtra Political News: तर तुमच्यातीलच पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला आमदार बनवायचे असल्याचे बोलून दाखविले.

सकाळ वृत्तसेवा

Latest Vidharbha Political News: आगामी विधानसभा निवडणुक च्या माध्यमातून 25 आगष्ट ला मनसे चे राज ठाकरे बुलढाणा जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी शेगांव येथे आले होते . त्यांचे मनोगत ऐकण्यासाठी जिल्हाभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते.

अशावेळी राज ठाकरे काय कानमंत्र देतील याकडे सर्वांचे लक्ष लागून होते . परंतु ऐनवेळी राज ठाकरे यांनी मेळाव्यातून संबोधित न करता जिल्ह्यातील मोजक्याच पदाधिकाऱ्यां सोबत बंद द्वार चर्चा केली. त्यात मला भाडोत्री नव्हे तर तुमच्यातीलच पक्षनिष्ठ कार्यकर्त्याला आमदार बनवायचे असल्याचे बोलून दाखविले.

बाहेर उभे असलेल्या अनेक कार्यकर्त्यांना आत प्रवेश मिळाला नसल्याने नाराजीचा सूरही यावेळी दिसून आला. आगामी विधानसभा निवडणूकीच्या तयारीत सर्वच पक्षाच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत. या निमित्ताने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे विदर्भ दौऱ्यावर असून रविवारी ते शेगावात आले होते.

सायंकाळी ६.३० वाजता त्यांनी स्थानिक देशमुख मंगल कार्यालय सभागृहात जिल्ह्यातील जिल्हा प्रमुख जिल्हा उपप्रमुख तालुकाप्रमुख तालुका उपप्रमुख शहर प्रमुख शहर उपप्रमुख या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला व विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश दिले.

आपण सर्व जागा लढवू, मला भाडोत्री आमदार नव्हे तर तुमच्या मधून पक्षनिष्ठा असलेल्या पैकी आमदार करायचे आहेत. असेही ते यावेळी बोलताना म्हणाले असल्याचे काही पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातून असंख्य पदाधिकारी व मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित झाले होते. मात्र राज ठाकरेंनी सभागृहात आल्यावर मी या ठिकाणी मेळाव्यासाठी किंवा संवाद साधण्यासाठी आलो नाही.

मी फक्त विधानसभा निवडणूक अनुषंगाने प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायला आलो आहे.तुम्हाला मार्गदर्शन करायला मी पुन्हा येईल असे राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर त्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांना सभागृहात थांबू दिले. व इतरांना बाहेर पडण्याचा आदेश केला.त्यामुळे जमलेल्या असंख्य मनसे सैनिकांचा भ्रमनिरास झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Semi Final Scenario : भारताने बाजी मारली, तरीही उपांत्य फेरीचे स्थान संकटात! ऑस्ट्रेलियाचा अडथळा, जाणून घ्या चक्रावणारे समीकरण

Ketan Agarwal Killed Case : सिया आणि प्रियकर चेतनने रचला थंड डोक्याने कट; पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल

Nasrapur Crime Case : पोलिसांच्या ‘ॲक्शन प्लॅन’मुळे अवघ्या १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र

ENG vs NZ 3rd Test: टॉम लॅथम-डेव्हॉन कॉनवे यांनी इंग्लंडचा 'बँड' वाजवला; दोघांची शतकं अन् मोडला १९३० सालचा मोठा विक्रम

MI फ्रँचायझीचा धक्कादायक निर्णय! पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरला संघात घेतलं? भारत-पाक क्रिकेट चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT