उमरखेड (जि. यवतमाळ) : अखिल भारतीय कॉंग्रेसचे गुजरात राज्य प्रभारी तथा हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजीव सातव यांना सोळाव्या लोकसभेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल सलग चौथ्यांदा संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. चेन्नईच्या राजभवनात राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते सातव यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या प्रसंगी माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी .एस. कृष्णमूर्ती, संस्थेचे अध्यक्ष के. श्रीनिवास उपस्थित होते. प्राईम पॉईंट फाउंडेशनतर्फे दरवर्षी लोकसभेत अष्टपैलू कामगिरी बजावणाऱ्या लोकसभा व राज्यसभा सदस्यांना हा पुरस्कार देण्यात येतो. सलग चौथ्यांदा खासदार राजीव सातव हे अष्टपैलू कामगिरीमुळे पुरस्काराचे मानकरी ठरले. विशेष म्हणजे लोकसभेच्या अव्वल पाच खासदारांत महाराष्ट्रातील खासदारांचा समावेश आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.