एटापल्ली : नक्षल्यांनी टाकलेले पत्रक.
एटापल्ली : नक्षल्यांनी टाकलेले पत्रक. 
विदर्भ

रामको, शिल्पाला पोलिसांनी पकडून ठार केल्याचा आरोप

सकाळवृत्तसेवा

एटापल्ली (जि. गडचिरोली) : तालुक्‍यातील सुरजागड लोहखनिज पहाडी परिसरात नक्षलवाद्यांनी पत्रके टाकून जहाल महिला नक्षलवादी रामको व शिल्पाच्या हत्येवर संशय व्यक्त केला आहे. दोघींचीही हत्या चकमक किंवा बॉम्बस्फोटात झाली नसून पोलिसांनी त्यांना पकडून जीवे मारले, असे पत्रकातून म्हटले आहे.
शनिवारी (ता. 27) दुपारी साडेबाराच्या सुमारास गुंडूरवाही व पुलनार गावांच्या जंगल परिसरात पोलिस व नक्षल्यांमध्ये चकमक झाली होती. यात रामको व शिल्पा अशा दोन जहाल महिला नक्षलवादी ठार झाल्या होत्या. मात्र, नक्षलवाद्यांनी संशय घेत अशी कोणतीही चकमक झाली नसून दोन्ही महिला जीवनावश्‍यक साहित्य खरेदी करून गुंडूरवाही व पुलनार गावांच्या जंगल परिसरातून कोणत्याही शस्त्राशिवाय जात असताना पोलिसांच्या सी-60 पथकाने त्यांना ताब्यात घेऊन निर्दयीपणे त्यांची हत्या केली, असा आरोप गोंडी व माडिया भाषेतील पत्रकातून करण्यात आला आहे. अशा खोट्या कृत्याचा विरोध करण्याचे तसेच कसनासूर व बोरिया जंगल परिसरात पोलिसांनी ठार केलेल्या 40 माओवाद्यांच्या हत्येचा बदला घेण्यासाठी चळवळीत सहभागी होण्याचे आवाहनसुद्धा पत्रकातून करण्यात आले आहे. पत्रकात भारतीय कम्युनिस्ट पार्टी (माओवादी) असा उल्लेख आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा ना'पाक' कृत्य! जम्मू-काश्मीरमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांचा हल्ला

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

IPL 2024 RCB vs GT Live Score: विराटचा डायरेक्ट थ्रो अन् गुजरातचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Latest Marathi News Live Update: बाळासाहेबांना हिंदूहृदयसम्राट म्हणा- उद्धव ठाकरे

SCROLL FOR NEXT