Rani Beti win prize in PIFF
Rani Beti win prize in PIFF 
विदर्भ

मेळघाटच्या शिरपेचात मानाचा तुरा..'राणी बेटी' लघुपटाला तृतीय पुरस्कार

राज इंगळे

अचलपूर ः आंतरराष्ट्रीयस्तरावर अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा 18 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात "चानकी सोकडा' व 'राणी बेटी' या दोन्ही लघुचित्रपटांना प्रदर्शित होण्यासाठी नामांकन मिळाले आहे. 
त्यापैकी राणी बेटी या लघुचित्रपटाने आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात तृतीय क्रमांक पटकावला. त्यामुळे मेळघाटच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला.

धारणी येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पद्वारा निर्मित आणि स्थानिक कलाकारांना घेऊन बनविण्यात आलेल्या चानकी सोकडा व राणी बेटी या दोन्ही लघुचित्रपटांना आंतरराष्ट्रीयस्तरावर अत्यंत महत्त्वाचा व प्रतिष्ठेचा समजला जाणारा 18 व्या आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात प्रदर्शित होण्यासाठी नामांकन मिळाले होते.

पुणे येथे आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात प्रदर्शित झालेल्या दोन लघुपटांपैकी "राणी बेटी' या लघुचित्रपटाने आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सवात तृतीय क्रमांक पटकावला. हा सोहळा पुणे येथील नॅशनल फिल्म अर्चिव्ह येथे पार पडला. विशेष म्हणजे या दोन्ही लघुचित्रपटांचे लेखन प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी केले.

या लघुचित्रपटाचे दिग्दर्शन धर्मा वानखडे यांनी केले आहे. या लघुचित्रपटास संगीत फैसल बक्ष व कुणाल घाटोल यांनी दिले. सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे, या दोन्ही लघुचित्रपटाचे चित्रीकरण धारणी तालुक्यादतील गावांमध्ये करण्यात आले. हे दोन्ही लघुचित्रपट आदिवासी, कोरकू समाज जीवनावर आधारित असून त्यांची जीवनशैली, राहणीमान, आरोग्य, शिक्षण, आधुनिकता आदी बाबीवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 

या लघुचित्रपटाची निर्मिती करण्याकरिता प्रकल्प अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, डॉ. नितीन मरकाम, व्ही. जी. धनगर, के. बी. पटेल, एस. टी. खिल्लारे, आर. डी. शिंदे, आर. एम. नागराळे, श्री. मसराम, सी. पी. राठोड, श्री. चव्हाण, श्री. शेलारे, श्री. दारशिम्बे, श्री. मेटकर, श्री. गायन, रामगोपाल भिलावेकर, अनिल धांडे, जगन दारशिंबे, श्री. जावरकर, श्री. मावस्कर यांचे सहकार्य लाभले.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT