crime
crime 
विदर्भ

पहिल्याच भेटीत फेसबुक फ्रेंडने केला मैत्रिणीवर बलात्कार

सकाळवृत्तसेवा

नागपूर : फेसबुकवर फ्रेंडशिप झाल्यानंतर युवकाने पहिल्याच भेटीत युवतीवर बलात्कार केला. त्यानंतर वारंवार भेट घेऊन बळजबरीने
शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकरणी युवतीच्या तक्रारीवरून
मानकापूर पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आकाश गजानन टाले (वय 22, रा. मानवसेवा नगर) असे आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश टाले हा एका जेवण पोहचविणाऱ्या कंपनीत "डिलीव्हरी बॉय' म्हणून काम करतो. तर गिट्‌टीखदानमधील धम्मनगरात राहणारी पीडित 17 वर्षीय दिव्यानी (बदललेले नाव) ही बाराव्या वर्गाची विद्यार्थीनी आहे. ती पार्टटाईम घरात ब्युटी पार्लर चालविते.

आकाशने फेसबूकवर "स्टायलीश' फोटो टाकून अनेक मुलींना फ्रेंड रिक्‍वेस्ट पाठविली. दिव्यानीलाही रिक्‍वेस्ट पाठवली होती. दोघांची फेसबूकवरून चॅटिंग सुरू केली. दोघांनी मोबाईल क्रमांक एकमेकांना दिला. दोघांची मैत्री झाली. दोघांनी भेटण्याचा निर्णय घेतला. पहिल्याच भेटीत आकाशने तिला स्वतःच्या घरी नेले. घरी कुणीही नसल्याची संधी साधून तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. मात्र, तिने नकार दिला. आकाशने तिच्यावर बळबरीने बलात्कार केला. त्यानंतर काही दिवस दिवस आकाशपासून दूर राहिली. आकाशने तिचा पाठलाग करीत तिच्या घराचा पत्ता शोधला. प्रेमप्रकरणाबाबत आईवडीलाल सांगण्याची धमकी देऊन अनेक वेळा तिला बाहेर फिरायला घेऊन गेला. तो वारंवार तिला घरी आणि मित्रांच्या खोलीवर नेऊन आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करीत होता. दरम्यान गिट्टीखदान आणि मानकापुरात राहणाऱ्या अनेक नातेवाईकांना प्रेमप्रकरणाची माहिती मिळाली. दिव्यानीच्या घरापर्यंत प्रकरण गेल्यानंतर "आम्ही लग्न करणार आहोत' असे तिने सांगितले.

आकाशच्या नेहमीच्या शारीरिक संबंधाच्या मागणीला ती कंटाळली होती. शेवटी दिव्यानीने त्याला लग्नासाठी तगादा लावला. लग्न करावे लागणार या भीतीपोटी तो दिव्यानीला टाळाटाळ करीत होता. या प्रकरणी दिव्यानीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आकाश टालेला अटक केली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : 25 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढलं; पंतप्रधान नरेंद्र मोदी माळशिरसमधून लाईव्ह

SCROLL FOR NEXT