rasta roko
rasta roko 
विदर्भ

शेतकऱ्याने गांधीगिरी करीत महामार्गावरच उभी केली बैलगाडी, तब्बल एक तास बंद होती वाहतुक

श्रीकृष्ण गोरे

राजुरा (चंद्रपूर) : शेतकऱ्यांना शेतीची कामे सोडून आपल्या मागण्यांसाठी रस्ता रोके करण्याची वेळ येत आहे. अनेक वकळा अर्ज-विनंत्या करून, अनेकदा कार्यालयात खेटे घालूनही एका शेतकऱ्याचे शेतीसंबंधी प्रकरण जिल्हाधिकारी कार्याल्यात प्रलंबित आहे. शेवटी त्याने आपल्या मागण्यांसाठी गांधीगिरी करण्याचे ठरविले आणि राजुरा-असिफाबाद महामार्ग तब्बल 1 तास अडवून धरला होता. परिणामी दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या आणि शेवटी पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. त्याच्या या रास्ता रोकोने त्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील शेतीविषयक प्रलंबित प्रकरण निकाली लागेल किंवा नाही, हे सांगणे कठीण आहे, मात्र त्याला पोलिस कोठडीची हवा खावी लागली, हे सत्य आहे.
मागील अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले जिल्हाधिकारी कार्यालयातील शेतीसंबंधीप्रकरण निकाली न काढल्याने वारलू निरंजने या शेतकऱ्याने राजुरा-असिफाबाद राष्ट्रीय महामार्ग आज (दि.2) पहाटे सहा वाजता रोखून धरला. त्यामुळे काही काळ मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या अखेर पोलीस निरीक्षकांनी घटनास्थळी जाऊन एक तासानंतर रस्ता मोकळा केला.

राजुरा तालुक्‍यातील वरुर (रोड) येथील वारलू निरंजने या व्यक्तीने अनेक दिवसांपासून शेतीसंबंधी प्रकरण जिल्हाधिकारी कार्यालयाने निकाली न काढल्यामुळे राजुरा-असिफाबाद राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या वरुर (रोड) येथे रस्त्यावर बैलबंडी, थोर पुरुषांचे फोटो व दोर बांधून एक तास रस्ता अडवून धरला होता. यादरम्यान दोन्ही बाजूंनी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. सदर घटनेची माहिती राजुरा पोलिस निरीक्षक नरेंद्र कोसुरकर यांना मिळताच त्यांनी वरुर गाठीत रस्त्यावर ठेवलेले महापुरुषांचे फोटो, बैलबंडी व दोरखंड हटवून रस्ता मोकळा केला व वारलू निरंजने यांना ताब्यात घेतले. वारलू निरंजने यांना अटकपूर्व जामीन देण्यात आला आहे. पुढील तपास राजुरा पोलिस विनायक कुलमेथे करीत आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi : 'सामान्य नागरिकाच्या घराचं वीज बिल शून्यावर आणणं माझं ध्येय'; पंतप्रधान मोदींनी सांगितला फ्युचर प्लॅन

Latest Marathi News Live Update: राजन विचारे उमेदवारी अर्ज दाखल करायला निघाले; ठाकरेंची उपस्थिती

Mumbai News: महाराष्ट्र दिनानिमित्त दादरसह परिसरातील वाहतुकीत बदल, वाचा महत्वाची बातमी 

Viral Video: रायफल्सच्या धाकाने ताब्यात घेत जाळली कार, वाचा न्यायाधीशाच्या अपहरण आणि सुटकेचा थरार

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

SCROLL FOR NEXT