विदर्भ

"टीएचआर' पुरवठ्यात बचतगटांना तोटाच

मंगेश गोमासे
नागपूर : राज्यातील अंगणवाड्यांना देण्यात येणाऱ्या टीएचआर (टेक होम रेशन) पुरवठ्याचे कंत्राट बचतगटांना घेताच येऊ असा खटाटोप महिला व बालकल्याण विभागातर्फे केल्या जात असल्याची शंका व्यक्त होत आहे. वर्षाला पुरवठ्यासाठी सहा लाखांच्या देयकांसाठी 10 लाखांची मशीन घेण्याची अट निविदेत टाकण्यात आली आहे.
"टीएचआर' पुरवठ्यासाठी महिला व बालकल्याण विभागाकडून काढण्यात आलेल्या निविदामध्ये प्रत्येक बचतगटाला किमान पाच अंगणवाडी केंद्र मंजूर करण्यात येणार आहे. या पाच केंद्रातील 250 लाभार्थींना 8 रुपयाप्रमाणे 300 दिवस टीएचआरचा पुरवठा करायचा आहे. त्यासाठी सरकारकडून 6 लाख वर्षाकाठी मिळणार आहेत. मात्र, निविदामध्ये असलेल्या अटीनुसार "रोस्टर' पद्धतीने उत्पादन करायचे असल्यास त्यासाठी किमान दहा लाखांची मशीन खरेदी करावी लागेल तर एक्‍सट्रॅक्‍शन पद्धतीने उत्पादन करायचे असल्यास 20 लाख खर्च येतो. त्यामुळे "घडाईपेक्षा मडाई' जास्त असल्याने या निविदेला बचतगटाकडून प्रतिसाद मिळणार नाही. दुसरीकडे बचतगटांना बीपीएल दरात केवळ गव्हाचा पुरवठा करण्यात येणार आहे. मात्र, त्यानंतर "टीएचआर' तयार करताना, हरभरा, साखर, शेंगदाणा, तेल, हिरवे मूग, गोडा, तिखट मसाला यासारखे पदार्थ बाजारमूल्यावर बचतगटांना खरेदी करायचे आहे. त्यामुळे इतक्‍या कमी पैशात हा खरेदी कसा करणार हा प्रश्‍न आहे. त्यातूनच बचतगटांमध्ये रोष आहे. निविदांमध्ये अशा प्रकारच्या जाचक अटी टाकून सरकारकडून बचतगटांनी त्यात सहभागीच होऊ नये अशी भूमिका घेतली की काय? हे उमगत नाही.
खासगी कंत्राटदारांना काम देण्याचा डाव
महाराष्ट्र कन्झ्युमर फेडरेशनच्या वतीने 17 ऑगस्टला "टीएचआर'ऐवजी कडधान्य पुरवठा करण्याकरिता आणि अंगणवाडी केंद्राकरिता बचतगटांकडून निविदा मागविण्यात आल्या आहेत. त्यासाठी निविदा सादर करणाऱ्यांना सर्वच जिल्ह्याकरिता बॅंक गॅरन्टी किमान दीड कोटी मागितले आहे. महाराष्ट्र कन्झ्युमर फेडरेशन ही सर्व यंत्रणा स्वत: काम न करता, इतर कंत्राटदारांकडून हे काम कमिशन तत्त्वावर करून घेतात. त्यासाठीच अशाप्रकारच्या निविदा काढण्यात आल्या असल्याचे दिसून येते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

DY Chandrachud: CJI चंद्रचूड मुलांमधील सायबर गुन्ह्यांबद्दल चिंतित, आंतरराष्ट्रीय सहकार्याचे केले आवाहन

Brittany Lauga: ड्रग्जच्या नशेत ऑस्ट्रेलियन महिला खासदाराचे लैंगिक शोषण, इंस्टाग्राम पोस्टद्वारे व्यक्त केल्या वेदना

ICC ची मोठी घोषणा! महिला T20 World Cup 2024 चे शेड्यूल जाहीर; जाणून घ्या कधी भिडणार भारत-पाकिस्तान

SCROLL FOR NEXT