Ravi Rana and Navneet Rana
Ravi Rana and Navneet Rana Ravi Rana and Navneet Rana
विदर्भ

Amravati : प्रत्युत्तरात राणा दाम्पत्यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळले

सकाळ डिजिटल टीम

नागपूर : राजमाता जिजाऊ यांच्या जन्मदिनी आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने येथील राजापेठ उड्डाणपुलावर बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा (Chatrapati shivaji maharaj) मध्यरात्री पोलिस बंदोबस्तात हटविला होता. यामुळे रविवारी सकाळपासून वाद सुरू होता. याचा आरोप पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर करण्यात आला होता. यामुळे मंगळवारी दुपारी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या समर्थकांनी महिला व बालविकास मंत्री आणि पालकमंत्री यशोमती ठाकूर यांचा पुतळा जाळला होता. यानंतर युवक कॉंग्रेसने तिवसा येथील पेट्रोल पंप चौकात राणा दाम्पत्याचा पुतळा जाळला.

अमरावतीच्या राजापेठ चौकातील उड्डाणपुलावरील शिवाजी महाराजांच्या (Chatrapati shivaji maharaj) पुतळ्याचे प्रकरण आता चांगलेच तापले आहे. आमदार राणा यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा उड्डाणपुलावर स्थापन करताना परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे महानगरपालिकेने पुतळा हटविला होता. यामुळे राणा दाम्पत्य आक्रमक झाले होते.

रविवारी पुतळा हटविल्याचे खापर पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्यावर फोडल्यानंतर मंगळवारी दुपारी राणा (Ravi Rana) यांच्या समर्थकांनी यशोमती ठाकूर यांचा पुतळा बडनेरा येथे जाळला. यावेळी कार्यकर्त्यांनी आक्षेपार्ह घोषणाबाजी केल्याचा आरोप कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर कॉंग्रेसचे कार्यकर्ते संतप्त झाले होते. युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ५.४० वाजता अमरावती-नागपूर महामार्गावरील तिवसा पेट्रोल पंप चौकात राणा (Navneet Rana) दाम्पत्याचे प्रतीकात्मक पुतळे जाळले. पोलिसांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना अटक केली असून सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sam Pitroda: पित्रोदांच्या विधानावरुन PM मोदींचं तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान; म्हणाले, युती...

SRH vs LSG Live Score : तिसऱ्या स्थानासाठी हैदराबाद अन् लखनौ भिडणार

पूंछमध्ये हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचे फोटो समोर, पाकिस्तानशी थेट कनेक्शनची शक्यता

High Court : ''मुस्लिमांना लिव्ह-इन-रिलेशनशीपमध्ये राहण्याचा अधिकार नाही'', हायकोर्टाने नेमकं काय म्हटलं?

Pankaja Munde Audio: "पंकजा मुंडेंच्या ऑडिओ क्लीपची चौकशी करा"; बजरंग सोनावणेंची निवडणूक आयोगाकडं मागणी

SCROLL FOR NEXT