akola stain buying process to white gold sakal
विदर्भ

अकोला : पांढऱ्या सोन्याला विक्रमी भाव

अकोट बाजार समितीत कपाशीला मिळाला प्रतिक्विंटल १२ हजार रुपये भाव

सकाळ वृत्तसेवा : संतोष शाळिग्राम

अकोला : शेतकरी अखंड मेहनतीने वर्षभर काबाडकष्ट करीत असतो आणि त्याच्या कष्टाचं फळ म्हणजे येणारे पीक. यावर्षी शेतकऱ्याच्या पांढऱ्या सोन्याला (कापूस) २५ मार्च रोजी १२ हजार इतका विक्रमी भाव आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीत मिळाला आहे. त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून येत आहे.

अकोट बाजार समितीमध्ये विदर्भातील जवळपास सर्व जिल्ह्यातून व महाराष्ट्रभरातून कापूस विक्रीसाठी येतो. विदर्भ, मराठवाडा व खान्देशात सर्वाधिक पिकणाऱ्या पांढरे सोने अर्थात कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंददायी बातमी आहे. अकोला जिल्ह्यातील अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पांढरे सोने कापसाला यावर्षीच्या हंगामातील सर्वाधिक १२ हजार रुपये प्रति क्विंटल भाव विठ्ठल झटाले याना मिळाला. मागील वर्षी खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले. कापूस पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाणही कमी झाले आहे. परिणामी कापसाच्या उत्पादनात मोठी घट झाली.

मात्र व्यापाऱ्यांकडून कापसाला मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापसाला चांगला दर मिळाला आहे.अकोट कृषि उत्पन्न बाजार समितीमधे जाहीर लिलाव पद्धतीने कापसाची खरेदी केली जाते शिवाय व्यापाऱ्यांची व जिनिंगची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने कापसाचे मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने बळीराज्याच्या कपाशीला चांगला दर मिळत आहे. आता बाजाराची आवक तुलनेने कमी झालेली असून, अस्मानी व सुलतानी संकटाचा कायम सामना करणाऱ्या बळीराजाच्या कपाशीला यावर्षी का होईना चांगला दर मिळतो आहे हे समाधान मोठे आहे.

विदर्भातील कापसाची मोठी बाजारपेठ म्हणून अकोट कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. मुख्य प्रशासक व प्रशासक मंडळाने शेतकऱ्यांच्या दृष्टीने केलेल्या उपाययोजना राबविलेले उपक्रम यामुळे कोरोणा काळातही बाजार समिती कधीही बंद पडली नाही. शेतकऱ्यांचा बाजार समितीप्रती असलेला विश्वास व्यापाऱ्यांच्या माध्यमातून जाहीर लिलाव पद्धतीने होत असलेली खरेदी यामुळे महाराष्ट्रतील कपाशीला सर्वाधिक दर देणारी बाजार समिती म्हणून अकोट बाजार समितीचा नावलौकिक आहे.

- विशाल प्रभाकर बोरे, प्रशासक, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट

दोन दिवसातील आवक आणि मिळालेला भाव

तारीख आवक मिळालेला भाव

२३ मार्च २८२५ क्विंटल ८४३०-११८३५

२४ मार्च २२८० क्विंटल ९०००-११८४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT